तेहमी मसालावाला
तेहमी मसालावाला (जन्म - १७ जानेवारी १९१७, मुंबई) कवयित्री, शिक्षिका, भाषांतरकार [१] श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या एक अनुयायी.
जीवन व कार्य
[संपादन]पारशी कुटुंबात जन्मलेल्या तेहमी यांचे वडील शल्यविशारद होते. ते भोपाळ येथील भोपाळ हॉस्पिटलमध्ये चिफ मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. तेहमी यांची आई देखील डॉक्टर होती. त्यांचे वैद्यकीय शिक्षण आयर्लंड मध्ये झाले होते. भोपाळमध्ये त्या काळी चांगल्या शिक्षणाची सोय नसल्याने तेहमी व त्यांचा भाऊ (पुढे डॉक्टर झाले.) यांना लहानपणीच मुंबईला नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते.
मुंबईमध्ये क्वीन मेरी स्कूलमध्ये तेहमी यांचे शिक्षण झाले. सेंट झेवियर कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी फ्रेंच साहित्यामध्ये बी.ए.पदवी संपादन केली होती. पुढे त्यांनी मुंबईमध्ये सोफिया कॉलेजमध्ये साहित्याच्या अध्यापनाचे काम केले.[१] तेथे अध्यापन करत असताना श्रीअरविंद यांचे साहित्य त्यांच्या वाचनात आले. १९४८ साली त्या श्रीअरविंद आश्रमात कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्या अध्यात्ममार्गाकडे वळलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी अविवाहित राहण्याचे ठरविले. त्या ५३ वर्षे गोळकोंड या श्रीअरविंद आश्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण गेस्ट हाउसमध्ये राहत असत. आश्रमात आल्यानंतर त्यांना सुतारकाम विभागात पर्यावेक्षणाचे काम देण्यात आले. नंतर ग्रंथालयातील काम त्यांना देण्यात आले. पुढे त्या श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे अध्यापन करू लागल्या. त्याच्या बुलेटिनच्या कार्यातही त्या सहभागी झाल्या. त्या विद्यार्थ्यांना सावित्री (श्रीअरविंद लिखित महाकाव्य) शिकवीत असत.
श्रीमाताजींच्या सांगण्यावरून त्यांनी लेखक म्हणून तेहमी या नावाऐवजी थेमिस (ग्रीक न्यायदेवता) हे नाव धारण केले. तेहमी यांच्या कवितांवर श्रीअरविंद व अमल किरण यांनी अनुकूल अभिप्राय दिलेला होता.[१] लेखन, काव्यलेखन या प्रमाणेच चित्रकला आणि गिटारवादन या कलादेखील त्यांना अवगत होत्या.[२]
प्रकाशित लेखन
[संपादन]- श्रीमाताजी यांच्या प्रश्नोत्तरांचे भाषांतर (फ्रेंचमधून इंग्रजीमध्ये)
- सत्प्रेम लिखित 'श्रीऑरोबिंदो ऑर द ॲडवेंचर ऑफ कॉन्शसनेस' हे भाषांतरित पुस्तक (फ्रेंचमधून इंग्रजीमध्ये)
- सत्प्रेम लिखित 'ऑन द वे टू सुपरमॅनहूड' हे भाषांतरित पुस्तक (फ्रेंचमधून इंग्रजीमध्ये)
- डीमीटर आणि पर्सेफोन (नाटक) - श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनतर्फे प्रकाशित, १९९५ [३]
- पोएम्स [४]
- 'फ्लॉवर्स अँड देअर मेसेजेस' हे भाषांतरित पुस्तक (फ्रेंचमधून इंग्रजीमध्ये) [५]
- तेहमी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'श्रीअरविंदाची जीवनकथा' या नावाने प्रसिद्ध आहे. अनुवादक - विमल भिडे [६]
पूरक वाचन
[संपादन]एका विद्यार्थिनीने तेहमी यांच्यावर लिहिलेला लेख [७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Anie Nunnally (2004). The Golden Path. California: East West Cultural Center, The Sri Aurobindo Center of Los Angeles. ISBN 0-930736-05-2.
- ^ Living in the Presence by Shobha Mitra
- ^ "Demeter and Persephone - Book by Themis : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-16 रोजी पाहिले.
- ^ "Tehmi". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-16 रोजी पाहिले.
- ^ "The Golden Path - Book by Anie Nunnally : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-16 रोजी पाहिले.
- ^ "श्री अरबिंदाची जीवन कथा - Marathi Book by Vimal Bhide : Read". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-16 रोजी पाहिले.
- ^ "'Tehmi-ben' by Jharna Ghosh : article". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-16 रोजी पाहिले.