तेरेखोल नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेरेखोल नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

तेरेखोल नदी ही महाराष्ट्रातील [[सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रेडी गावातून वाहत जाऊन गोवा राज्यात जाणारी एक नदी आहे.तेरेखोल नदी महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत जाऊन उत्तर गोव्यात प्रवेश करते. त्यानंतर मनोहर गड आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे झालेला आहे. या नदीचे दुसरे नाव बांदा नदी आहे. तेरेखोल किल्ला तेरेखोल नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेला आहे. गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वास्तविक सीमा बनविणारी ही नदी आहे. या नदीची एकूण लांबी ३२ कि.मी. असून महाराष्ट्रात तिची लांबी ६ किमी. तर गोव्यात तीची लांबी २६ कि.मी. आहे.