तेंडोली (कुडाळ)
| ?तेंडोली महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | कुडाळ |
| जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०७ |
तेंडोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. भात शेती बरोबरच आंबा,काजू, पोफळी,माड इत्यादी बागा मुबलक प्रमाणावर दिसून येतात. उज्वला नदीच्या पाण्यामुळे आणि डोंगरांमुळे हा गाव जगाच्या नकाशावर हिरवागार सुजलाम सुफलाम असाच दिसून येतो.https://www.wikidata.org/wiki/Special:EntityPage/Q8
लोकजीवन
[संपादन]या गावातील बहुतेक लोक शेती व्यवसायामध्ये व्यस्त असतात. भातशेती बरोबरच बागायती हा प्रमुख व्यवसाय आहे. काजू,नारळ,पोफळी या बागायतीवर इथले अर्थकारण चालते. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची संख्या या ठिकाणी थोडीफार आहे.https://commons.wikimedia.org/w/index.php?title=Special:Upload&wpDestFile=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1.jpg&wpForReUpload=1#
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]निसर्गाच्या वरदहस्ताने नटलेले हे गाव असून गावाच्या मध्यभागी उज्वला नदी वाहते. या नदीच्या दोन्ही बाजूंच्या प्रदेश सुजलाम सुफलाम असून संपूर्ण गावामध्ये विविध मंदिरे गावच्या धार्मिक संस्कृतीची ओळख करून देतात.
गावातील मुख्य मंदिर म्हणजे श्री देव रवळनाथ पंचायतन, याच मंदिराच्या आवारात वेतोबा,भद्रकाली, गणपती, कल्याण पुरुष,सातेरी, दांडेकर,महादेव,गावडोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. याशिवाय भोमवाडी मधील अनलादेवी मंदिर, कुमणोस वाडीतील पुरुषोत्तम मंदिर, चिखलोण वाडीतील विठ्ठल मंदिर इत्यादी विविध वाडीमध्ये विविध देवतांची मंदिरे आहेत. गावाच्या पश्चिमेला चिदानंद स्वामी महाराजांची समाधी बागलची राई या ठिकाणी आहे. या ठिकाणी वाघांचे अस्तित्व आणि निवासस्थान असते. म्हणून याला बागलाची राई असे म्हणतात. निसर्ग संपत्तीने नटलेला शांत परिसर म्हणून बागलाची राई समाधी स्थान प्रसिद्ध आहे.
बागलची राई हे ठिकाण अतिशय शांत आध्यात्मिक समाधान देणारे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी चिदानंद स्वामी यांची समाधी आहे. बागलाची राई याचा अर्थ वाघ राहण्याचे ठिकाण . या ठिकाणी पूर्वी वाघांचे निवासस्थान होते. चिदानंद स्वामी महाराज प्रवचन करत असताना वाघ येऊन बसायचा. आजही त्या ठिकाणी पट्टेरी वाघाचे अस्तित्व आहे. समाधीच्या ठिकाणी असणारे पिंपळवृक्ष आणि नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेला निसर्गरम्य परिसर यामुळे या ठिकाणी वेगळीच अनुभूती येते.
कविवर्य आरती प्रभू यांचे आजोळ म्हणून बागलाची राई ठिकाणाला एक वेगळे महत्त्व आहे
नागरी सुविधा
[संपादन]सन 2011 च्या जनगणनेनुसार तेंडोली गावची लोकसंख्या साधारणता साडेतीन हजार आहें.
गावाचे एकूण क्षेत्रफळ 2313 हेक्टर एवढे आहे... तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून हे गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावांमध्ये सात प्राथमिक शाळा एक पूर्ण प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे. गावात सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत असून त्याच आवारात आरोग्य उपकेंद्र सोसायटी जिल्हा बँक पशुवैद्यकीय दवाखाना अशी विविध प्रकारची शासकीय सेवा देणारी कार्यालय आहेत.
जवळपासची गावे
[संपादन]विस्तीर्ण पसरलेल्या या गावांमध्ये डोंगर भाग आहे. पूर्व बाजूला माड्याची वाडी, गोवेरी, वेतोरे ही गावे आहेत. वायंगणी, आंदूरले या गावांनी तेंडोली गावाच्या सीमा वेढलेल्या आहेत. कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्याच्या हद्दीवर हा गाव येतो. गावाच्या पश्चिम भागातून सागरी महामार्ग जातो.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/