Jump to content

तुळशीबाई होळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराणी तुळशीबाई होळकर ( अं. १७८८  २० डिसेंबर, १८१७) या इंदूरचे महाराजा यशवंतराव होळकर यांची पत्नी होत्या. यांनी नोव्हेंबर १८११ ते २० डिसेंबर १८१७ दरम्यान मल्हारराव होळकर दुसरे यांच्यानावाने राज्याचा कारभार चालविला होता.

या महानुभाव पंथातील एक पुजारी अजिबा यांची पुत्री होत. त्या यशवंतराव होळकरांच्या अनेक पत्नींपैकी एक होत्या. यशवंतराव १८०६ मध्ये राजा झाले.

तुळसीबाईंना स्वतःला मुले नव्हती. १८११ मध्ये यशवंतराव होळकर यांच्या निधनानंतर, तुळशीबाईंनी ४ वर्षांच्या मल्हारराव होळकर दुसरे यांच्या नावे कारभार हाती घेतला. दुसरे मल्हारराव यशवंतरावांच्या इतर पत्नींपैकी एकापासून झालेले होते.

तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धा दरम्यान तुळशीबाईंनी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध मराठ्यांशी संधान बांधले व बाजीराव पेशव्यांशी हातमिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी कूच केली. त्यावेळी जनरल जॉन माल्कमने महिदपूरजवळ इंदूरी सैन्याला गाठून वाटाघाटी सुरू केल्या. तुळशीबाईंना ब्रिटिशांच्या अटी पटल्या व त्यांनी मराठ्यांची एक फळी उभारण्याचा निश्चय मागे घेण्याचे ठरवले, परंतु इंदूरी सैन्यातील काही सरदारांनी याला कडाडून विरोध केला. तुळशीबाईंची सैन्यावर फारशी पकड नव्हती. यावेळी झालेल्या झटापटींमध्ये २० डिसेंबर १८१७ रोजी सकाळी महिदपूरजवळील शिप्रा नदीच्या काठावर तिच्याच सैनिकांनी तिचा शिरच्छेद केला आणि तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. []

संदर्भ

[संपादन]
  1. "History - British Period- The Gazetteers Department - Jalgaon". Government of Maharashtra. March 1962. 24 September 2014 रोजी पाहिले.