Jump to content

तुर्कमेनिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कमेनिस्तानचा ध्वज

तुर्कमेनिस्तान फुटबॉल संघ (तुर्कमेन: Türkmenistanyň Milli futbol ýygyndysy; फिफा संकेत: TKM) हा मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला तुर्कमेनिस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४७ व्या स्थानावर आहे. १९९१ सालापर्यंत सोव्हियेत संघाचा भाग राहिलेल्या तुर्कमेनिस्तानने १९९४ पासून आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. २००४ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धमध्ये प्रवेश मिळवलेला तुर्कमेनिस्तान पहिल्याच फेरीत पराभूत झाला.

बाह्य दुवे[संपादन]