तुणतुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुणतुणे हे एक तंतुवाद्य आहे.हे 'एकतारी' सदृश्य वाद्य आहे.फक्त नाद यावा म्हणून साथीस याचा वापर होतो.यास वरच्या बाजूस असलेली खुंटी पिरगाळुन यास आवश्यक त्या स्वरात लावतात.यास एकच तार असल्यामुळे हे वाजविण्यास विशेष कौशल्य लागत नाही.याने फक्त ट्णकार उत्पन होतो.जागरण वा गोंधळात याचा वापर विशेषत्वाने होतो. [ चित्र हवे ]


'सारखे तेच 'तुणतुणे' कानाशी वाजवू नको'(एकच एक गोष्ट अनेक वेळा सांगणे.) अश्या प्रकारचा वाक्प्रचार याच वाद्यावरून पडला.