तुकाराम ओंबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तुकाराम ओंबले या पानावरून पुनर्निर्देशित)
तुकाराम ओंबळे
मृत्यू: नोव्हेंबर २७, २००८
चौपाटी , मुंबई
पुरस्कार: अशोक चक्र
प्रमुख स्मारके: गिरगाव चौपाटी
धर्म: हिंदू

तुकाराम ओंबळे (? - २६ नोव्हेंबर, इ.स. २००८:मुंबई, भारत) हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला

सारांश[संपादन]

ओंबळे हे मुंबई पोलिसात साहाय्यक पोलीस निरीक्षक होते. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात त्यांची तुकडी सशस्त्र नव्हती. अत्यंत तुटुपुंज्या शस्त्रांच्या मदतीने त्यांच्या तुकडीने दोनापैकी एका अतिरेक्यास ठार मारले.

अजमल कसाब या अतिरेक्यास पकडताना तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला. निःशस्त्र असलेल्या ओंबळे यांनी जखमी अजमल कसाबची बंदूक धरून त्याला अटक करण्यास अधिकाऱ्यांना मदत केली. पण त्याचवेळी कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा अंत झाला.

विस्तार[संपादन]

हल्ल्याच्या दिवशी तुकाराम ओंबळे हे रात्रीच्या पहाऱ्यावर होते. २७ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री १२:३० वाजता त्यांनी घरी शेवटचा फोन केला होता. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच ते गिरगाव चौपाटीकडे धावले. चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला. कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली , त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.

तुकाराम ओंबळ्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबळेना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

अजमल कसाब याला २० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृह येथे फाशी देऊन त्याचे तेथेच दफन करण्यात आले .

तुकाराम ओंबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार
  • चौपाटीवर ओंबळे यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
  • त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांना CNN Indian of the year हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अवश्य पहा[संपादन]