तुंगनाथ
Appearance
तुंगनाथ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | चामोली जिल्हा |
| भौगोलिक गुणक | ३०°२९′२२″N ७९°१२′५५″E |

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तुंगनाथ हे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक पवित्र मंदिर आहे. हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर असून ते १,२०७३ फूट उंचीवर स्थित आहे.[१] हे मंदिर 'पंचकेदार' या तीर्थक्षेत्रांच्या समूहाचा एक भाग आहे आणि 'तृतीय केदार' म्हणूनही ओळखले जाते; येथे भगवान शिवाच्या हातांची पूजा केली जाते.[२]
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध 'चोपटा-तुंगनाथ ट्रेक'. हा ट्रेक चोपटा गावातून सुरू होतो आणि तुंगनाथ मंदिरापर्यंत जातो. चोपटा हे गाव आपल्या हिरव्यागार दऱ्या आणि अथांग नैसर्गिक सौंदर्यामुळे 'उत्तराखंडचे मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखले जाते.[३] चोपटा ते तुंगनाथ हे अंतर ३.५ किमी आहे. तसेच, मंदिरापासून १.५ किमीची एक छोटी चढाई केल्यावर १३,१२३ फूट (४,००० मीटर) उंचीवर असलेल्या चंद्रशिला शिखरावर पोहोचता येते.