तिसरा असफ जाह
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | हैदराबाद संस्थान |
| स्थानिक भाषेतील नाव | سکندر جاہ ،آصف جاہ تریہم |
| दिलेले नाव | असफ |
| जन्म तारीख | ११ नोव्हेंबर 1768 |
| जन्मस्थान | हैदराबाद |
| मृत्यू तारीख | २१ मे 1829 |
| मृत्यूस्थान | हैदराबाद |
| चिरविश्रांतीस्थान | खुलताबाद, Mecca Masjid |
| वडील | आसफ जाह दुसरा, निजाम-उल- मुल्क |
| अपत्य | Asaf Jah IV of Hyderabad |
| व्यवसाय | sovereign |
| धर्म | इस्लाम धर्म |
सिकंदर जाह, तिसरा असफ जाह (११ नोव्हेंबर, १७६८ - २१ मे, १८२९), हा १८०३ ते १८२९ पर्यंत भारताच्या हैदराबादचा तिसरा निजाम होता. [१] त्यांचा जन्म खिलवाथमधील चौमहल्ला पॅलेसमध्ये झाला, तो असफ जाह दुसरा आणि तहनियत उन-निसा बेगम यांचा दुसरा मुलगा होता.
त्यांच्या पत्नींपैकी एक जहां परवर बेगम तथा हाज्जी बेगम होती. [२] ती अझीम उल-उमारा [३] तथा माअली मियां किंवा फरजंद बेगम हिची मुलगी आणि अरास्तु जाह यांची नात होती.[२] आणि मुनीर उल-मुल्क यांची भाची होती. [३] तिच्या अनेक नातेवाईक बायका निजाम घराण्याशी निगडीत होत्या.[४] सिकंदर जाहची दुसरी पत्नी फजिलत-उन-निसा बेगम तथा चांदनी बेगम नसिर-उद-दौला आणि मुबारेझ-उद-दौला यांची आई होती. [४]
- मुली
- जमाल-उन-निसा बेगम (मृत्यू २२ मार्च १८५५), सुरतचा निजाम सफदर-उद-दौला याचा भाऊ रफी-उद-दौलाशी विवाहित; [५]
- कमल-उन-निसा बेगम, मीर मोईन-उन-दिन हुसेन खान, गझनफर जंग, इम्तियाज-उद-दौला यांच्याशी विवाहित; [४]
- २५ मे १८२१ रोजी जफर-याब जंगच्या मुलाशी लग्न झालेली मुलगी; [४]
- सुलतान-उन-निसा बेगम, मोहम्मद सुलतान-उद-दीन खान, सबकत जंग, नवाब शम्स-उल-उमरा बहादूर यांचा मुलगा मुहताशाम-उद-दौलाशी विवाहित; [४] [६]
- नामदार-उन-निसा बेगम, मीर आलमचा नातेवाईक मीर अब्दुल कासिम सोहराब जंग मोइन-उद-दौलाशी विवाहित; [४]
- हशमत-उन-निसा बेगम, शम्स उल-उमारा, विकार उल-उमारा, अमीर-इ-कबीर, इक्तिदार उल-मुल्क, इक्तिदार उद-दौला, नवाब अबुल खैर खान बहादूर; [६]
अधिकृत नाव
[संपादन]याचे पूर्ण अधिकृत नाव सिकंदर जाह, असफ उल-मुल्क, असद उद-दौला, वालाशन नवाब मीर अकबर अली खान सिद्दीकी बहादूर, असद जंग असे होते. त्याला अधिकृतपणे तिसरा असफ जाह, निजाम उल-मुल्क, निजाम उद-दौला, मीर अकबर अली खान सिद्दीकी बहादूर, फौलाद जंग, हैदराबादचा निजाम म्हणून ओळखले जात असे. [७]
लष्करी कारकीर्द
[संपादन]तिसऱ्या असफ जाहच्या कारकिर्दीत, हैदराबादजवळ एक ब्रिटिश छावणी स्थापन करण्यात आली आणि त्या भागाला असफजाहच्या नावावरून सिकंदराबाद असे नाव दिले गेल. असफ जाहने तैनाती सैन्य राखण्यासाठी ब्रिटिशांशी करार केला नव्हता. त्याच्या कारकिर्दीत राज्य आर्थिक अडचणीत होते. [८] [९] तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात त्याने उघडपणे ब्रिटिशांना पाठिंबा दिला आणि लश्करी मदतसुद्धा केली होती.
शीख रेजिमेंट
[संपादन]निजामाच्या दरबारातील प्रभावी प्रतिष्ठित आणि पंजाबी खत्री महाराजा चंदू लालच्या शिफारशीवरून असफ जाहने १,२०० पेक्षा अधिक शीख सैनिक आपल्या सैन्यात सामील करून घेतले. याशिवाय १८३० च्या सुमारास महाराजा रणजित सिंग यांनी नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब अबिचलनगरच्या बांधकामासाठी सरदार चंदा सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणखी १५० माणसे पाठवली. [१०] [११]
अट्टापूर मंदिर
[संपादन]असफ जाहने यांनी हैदराबादमधील अट्टापूर येथे रामबाग मंदिर बांधवून घेतले. याच्या उद्घाटन समारंभाला हा उपस्थित होता. त्याद्वारे त्याने हैदराबादमधील मुस्लिम असफ जाही शासक आणि त्यांच्या हिंदू प्रजेमध्ये एकी कायम करण्याचा प्रयत्न केला. निजामाने मंदिराच्या देखभालीसाठी मंदिराच्या पुजाऱ्याला जहागीरही दिली. [१२] [१३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "The University of Queensland Homepage". 2003-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-07-01 रोजी पाहिले.
- 1 2 Roychoudhury, U. (2004). White Mughals. Penguin Group. p. xxiii. ISBN 978-0-14-303046-1.
- 1 2 Wilkinson, C. (2023). Empire of Influence. Cambridge University Press. p. 232. ISBN 978-1-009-31173-1.
- 1 2 3 4 5 6 Rao 1954.
- ↑ Rao 1954, पाने. 17, 27, 278–279.
- 1 2 Bawa, B.K. (1992). The Last Nizam: The Life and Times of Mir Osman Ali Khan. Viking. p. 2. ISBN 978-0-670-83997-1.
- ↑ "Seven Asaf Jah Rulers - Seven Nizams". 2012-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 September 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Asaf Jahis". AP state portal. 2020-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 September 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Asaf Jahis (1724-1948)". 21 September 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Dakkhani Sikhs - SikhiWiki, free Sikh encyclopedia". www.sikhiwiki.org. 2024-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-07-01 रोजी पाहिले.
- ↑ Singh, S. Harpal (29 December 2019). "Guru Nanak's centuries-old link with Nizam's Nirmal". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 28 April 2021 रोजी पाहिले.
- ↑ Nanisetti, Serish (8 April 2017). "Nizam built this temple". द हिंदू. thehindu. 8 July 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Rambagh temple, a hidden gem in the Hyderabad".
तिसरा असफ जाह असफ जाही वंश जन्म: १७६८ तिसरा असफ जाह | ||
| मागील दुसरा असफ जाह |
हैदराबादचे निजाम २६ वर्षे |
पुढील चौथा असफ जाह |