Jump to content

तियां

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तियां
सुट्टी
झोका खेळणाऱ्या मुली

तियां (पंजाबी : ਤੀਆਂ),ज्याला तियां दा त्योहार असे म्हटले जाते हा भारत देशाच्या पंजाब प्रांतातील सण आहे.[] हा सण श्रावण महिन्यातील तिसऱ्या दिवशी विशेषतः महिलांनी साजरा करावयाचा सण आहे. वर्षाऋतूचे स्वागत करणे हा या सणाचा मुख्य हेतू मनाला जातो.

उत्सवाचे स्वरूप

[संपादन]

आपल्याला चांगला पती लाभावा यासाठी कुमारिका हे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. हे निर्जला व्रत असल्याने यादिवशी पाणी न पिणे असा संकेत आहे.[] या सणासाठी विवाहित महिला आपल्या माहेरी जातात. सराव महिन्याच्या तृतीयेपासून पौर्णिमे पर्यंत या सणाच्या काळात विवाहित स्त्रीने आपल्या माहेरी राहण्याची पद्धती येथे प्रचलित होती. या काळात विवाहित कन्येला साडी, बांगड्या, मिठाई, मेहंदी दिली जाते आणि तिला झुलण्यासाठी झोका बांधला जातो. हे तिच्या भावाकडून तिला भेट दिले जाते. याला स्थानाईक भाषेत संधारा म्हटले जाते.

नृत्य

[संपादन]
गिद्दा

पूर्वीच्या काळी स्थानिक पद्धतीनुसार मुलींच्या इच्छा लक्षात घेऊन त्यांची हौस म्हणून या सणाचा कालावधी एक महिन्यापर्यंत वाढविला जात असे. नृत्याचा आनंद घेणे हा या सणाचा महत्वाचा भाग मनाला गेला आहे. गिद्दा हे पारंपरिक लोकनृत्य या काळात केले जाते व गाणी गाऊन आनंद घेतला जातो.[] उत्सवाची सांगता प्रौढ महिलांच्या भाल्लो नृत्याने होत असे. ग्रामीण भागात या उत्सवाच्या औचित्याने जत्रा भरत असत, मेळे भरविले जात असत.[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Teej: Colourful ode to monsoon". The Tribune (इंग्रजी भाषेत). 2026-03-12 रोजी पाहिले.
  2. "Teej Festival 2022: पंजाब में 31 जुलाई को मनाया जाएगा 'तीयां' का त्योहार, महिलाएं रखें इन बातों का ख्याल - Teej Festival 2022 Teeyan festival to be celebrated in Punjab on July 31". Jagran (हिंदी भाषेत). 2026-03-12 रोजी पाहिले.
  3. Bedī, Sohindara Siṅgha Waṇajārā (1971). Folklore of the Punjab (इंग्रजी भाषेत). National Book Trust, India; [chief stockists in India: India Book House, Bombay].
  4. Brard, Gurnam Singh Sidhu (2007). East of Indus: My Memories of Old Punjab (इंग्रजी भाषेत). Hemkunt Press. ISBN 978-81-7010-360-8.