तांडवनृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

तांडवनृत्य हा एक प्राचीन भारतीय नृत्यप्रकार आहे. .हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले, अशी पारंपरिक समजूत आहे. शारंगदेवाने रचलेल्या संगीतरत्नाकर या ग्रंथात तांडवनृत्याची उत्पती दिलेली आहे.ती अशी-

प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्रयुक्तं ततो हार: ।
तन्डूना स्वगणाग्रण्या भरताय न्यदीदृशत् ।।
लास्यमस्याग्रत: प्रीत्या पार्वत्या समदीदृशत् ।
बुद्ध्वाऽथ ताण्डवं तण्डोः मत्र्येभ्यो मुनयोऽवदन् ।।

याचा अर्थ शिवाने आपण पूर्वी केलेले नृत्य आठवून ते आपल्या गणांतील अग्रणी असलेल्या तंंडूकरवी भरतमुनीला दाखविले. तसेच लास्य हे नृत्य पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करून दाखविले. तंंडूने करून दाखविलेले तांडव, असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवाला शिकविले.[१]

प्रकार[संपादन]

या नृत्याचे सात प्रकार आहेत. आनंदतांडव,संध्यातांडव,कालिकातांडव,त्रिपुरतांडव,गौरीतांडव,संहारतांडव,उमातांडव या सात प्रकारापैकी नटराज शिवाला प्रिय आहे.असे सांगितले आहे.या सात प्रकारापैकी संध्यातांडवाचे वर्णन शिवप्रदोष स्तोतात आले आहे.जेव्हा शिव नृत्यासाठी सिद्ध होतो,त्या वेळी सरस्वती वीणा वाजवते,इंद्र बासरीतून स्वर छेडतो,ब्रह्मा ताल देतो,लक्ष्मी गाणे गाते,विष्णू मृदंग वाजवितो आणि सर्व देवदेवता भोवती उभ्या राहून हा नृत्यदर्शनाचा सोहळा अनुभवतात.या नृत्यात शिवाचे स्वरूप दोन भुजा असलेले आणि पायाखाली दैत्य चिरडला जात असल्याचे दृश्य नसते. वरील सात प्रकारापैकी गौरीतांडव व उमतांडव ही दोन्ही उग्र स्वरुपाची नृत्ये आहेत. या नृत्यात शिव हा भैरव अथवा वीरभद्र या स्वरुपात असतो.,त्याच्या बरोबर उमा अथवा गौरी असते.आणि जळता चिटणी युक्त अशा स्मशानभूमीत भूतगणाच्या साथीने ही भयानक नृत्य करतो.Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड ४