तमिळगा वेट्री कळघम
| स्थापना | २ फेब्रुवारी 2024 |
|---|---|
| संस्थापक | जोसेफ विजय |
| अध्यक्ष | जोसेफ विजय |
| देश | भारत |
| मुख्यालयाचे स्थान | चेन्नई |
| अधिकृत संकेतस्थळ | https://tvkvijay.com |
तमिळगा वेट्री कळघम (अर्थात:तमिळनाडूचा विजय पक्ष); (लघुरूप: टीव्हीके) हा पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेला एक भारतीय प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेते-राजकारणी विजय यांनी याची स्थापना केली आणि ते स्वतः पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. या पक्षाचे मुख्यालय पनैयुर, चेन्नई येथे आहे.
स्थापना
[संपादन]जुलै २००९ मध्ये, दाक्षिणात्य अभिनेता विजय याने 'विजय मक्कल इयक्कम' (विजयची लोकचळवळ) नावाच्या एका कल्याणकारी संस्थेच्या छत्राखाली [१][२] तमिळनाडूमध्ये अंदाजे ८५,००० फॅन क्लब्स संघटित केले.[३] या संघटनेने २०११ सालच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अद्रमुक (AIADMK) प्रणित युतीला पाठिंबा दिला होता.[४] राजकारणातील काही काळ निष्क्रियतेनंतर, या संघटनेने २०२१ मध्ये तमिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या आणि लढवलेल्या १६९ जागांपैकी ११५ जागा जिंकल्या.[५]
राजकीय घडामोडी
[संपादन]विजयने अधूनमधून राजकीय विधाने केली होती, जसे की फेब्रुवारी २०१९ मध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायद्याचा निषेध करणे आणि जून २०२३ मधील एका कार्यक्रमात इतर राजकीय पक्षांवर टीका करणे.[६][७] २ फेब्रुवारी २०२४ रोजी विजयने आपल्या राजकीय पक्षाची, 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK), घोषणा केली आणि २०२६ ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याचा आपला मानस व्यक्त केला. जुलै २०२४ मध्ये, विजयने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रद्द करण्याची मागणी केली आणि शिक्षण हा विषय समवर्ती सूचीतून पुन्हा राज्य सूचीमध्ये हलवण्याची मागणी केली. सप्टेंबर २०२४ मध्ये, TVK ने आपली विचारधारा आंबेडकर, पेरियार आणि कामराज यांच्या तत्त्वांचे अनुसरण करणारी, मध्य-डावी असल्याचे जाहीर केले.[८][९] पक्षाने पुढे कोणत्याही उजव्या विचारसरणीच्या राजकारणाशी संबंध नाकारले.[१०]
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी, पक्षाने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत ७०,००० पेक्षा जास्त बूथ एजंट नियुक्त करण्याची आणि अंतर्गत श्रेणीमध्ये बदल करण्याच्या योजनांसह मोठ्या प्रमाणावर सदस्यत्व नोंदणी मोहीम जाहीर केली.[११] १६ एप्रिल २०२५ रोजी, ऑल इंडिया मुस्लिम जमातने टीव्हीके प्रमुख विजय यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या अलीकडील इफ्तार मेळाव्यावरून आणि त्यांच्या इस्लामविरोधी वर्तनाबाबत एक फतवा (इस्लामी कायद्यातील कायदेशीर मत) जारी केल्याचे वृत्त आहे; ज्यामध्ये असा आरोप केला आहे की विजय यांच्या काही चित्रपट भूमिकांनी मुस्लिमांना नकारात्मक रीतीने चित्रित केले आहे, ज्यामध्ये त्यांचा संबंध दहशतवादाशी जोडला गेला आहे.[१२][१३][१४]
२७ सप्टेंबर २०२५ रोजी, करूरच्या बाहेरील भागात विजयने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीदरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ४१ लोकांचा मृत्यू झाला आणि ८० इतर जखमी झाले.[१५][१६] विजयने सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून शोक व्यक्त केला की त्याचे "हृदय विदीर्ण झाले आहे" आणि त्याने या घटनेचे वर्णन "अपूरणीय हानी" असे केले.[१७] तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना
२ दशलक्ष (US$४४,४००) आणि जखमींना
०.२ दशलक्ष (US$४,४४०) दिले जातील अशी देखील घोषणा केली.[१८] २७ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयने मामल्लपुरम येथे पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.[१९][२०] या घटनेमुळे अनेक खटले दाखल झाले आणि त्यानंतर या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी सुरू झाली.[२१][२२]
४ मार्च २०२६ रोजी, टीव्हीके (TVK) समर्थकांनी मीडिया आउटलेट्स आणि काल्पनिक मीडिया संस्थांच्या नावाखाली अनेक बनावट सोशल मीडिया खाती तयार केल्याचे वृत्त समोर आले. या खात्यांनी कथितपणे पत्रकार आणि प्रसारमाध्यमांबद्दल चुकीची आणि बदनामीकारक विधाने प्रसारित केली. त्यांनी तामिळनाडूतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करणारा आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केला. चेन्नई प्रेस क्लबने या घटनेचे वर्णन अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न असे केले आणि अभिनेता याला संबंधितांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.[२३]
७ मार्च २०२६ रोजी, पक्षाने चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान, पक्षप्रमुख विजय यांनी २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची आश्वासनांची पहिली यादी जाहीर केली.[२४] या घोषणा प्रामुख्याने महिला-केंद्रित होत्या, ज्यामध्ये मासिक आर्थिक मदत, मोफत एलपीजी सिलिंडर, सरकारी बसमध्ये मोफत प्रवास, गरीब कुटुंबातील वधूंना एक तोळे सोने आणि रेशमी साडी, नवजात बालकांसाठी सोन्याची अंगठी आणि 'वेलकम किट', गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी समर्पित सुरक्षा पथके यांचा समावेश होता.[२५][२६]
सध्याचे पदाधिकारी
[संपादन]| सदस्य | पूर्वीची निर्वाचित पदे | पक्षातील पद |
|---|---|---|
| विजय | अध्यक्ष[२७] | |
| एन आनंद | सरचिटणीस[२९] | |
| सी. टी. आर. निर्मल कुमार | ||
| पी. व्यंकटरमणन | खजिनदार[३०] | |
| जॉन अरोकियासामी | निवडणूक रणनीतीकार[२७] | |
| आढाव अर्जुना | प्रचार व्यवस्थापन सरचिटणीस[२७] | |
| के. जी. अरुणराज | प्रचार आणि धोरण सरचिटणीस[३१] | |
| के. ए. सेंगोट्टयन | उच्चस्तरीय प्रशासकीय समितीचे मुख्य समन्वयक[३४] | |
| राजसेकर | मुख्यालय सचिव[३५] | |
| प्रचार सचिव[२७] | ||
| नानजिल संपत | मोहीम सचिव[३६] | |
| सी. विजयलक्ष्मी | ||
| थाहिरा | संयुक्त सचिव[३५] |
संदर्भ
[संपादन]- ↑ "Vijay's fan club to take 'new dimension', hints at his political plunge". 26 August 2023. 1 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Vijay Makkal Iyakkam was launched in 2009". The Times of India. 28 September 2015. 14 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "The fan factor: Thalapathy Vijay's political future hinges on turning his fan base into a powerful electoral force". The Economic Times. 3 February 2024. 26 May 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Actor Vijay's Makkal Iyakkam to support AIADMK". The Hindu. 27 March 2011. 1 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ Chandrababu, Divya (15 January 2021). "Actor Vijay's fans win more 115 seats in Tamil Nadu local body polls". The Hindustan Times. 22 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Tamil Superstar Vijay Calls Citizenship Law CAA "Unacceptable"". NDTV. 22 February 2019. 6 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Actor Vijay speaks to students at meet in Chennai, takes a potshot at political parties". News Minute. 17 June 2023. 1 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Tamil actor Thalapathy Vijay announces political party, names it 'Thamizhaga Vettri Kazhagam'". India Today. 2 February 2024. 2 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "'Thalapathy' Vijay floats political party, names it 'Thamizhaga Vettri Kazhagam'". Deccan Herald. 2 February 2024. 6 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "DMK political enemy, BJP ideological foe: Actor Vijay". The Times of India. 28 October 2024. 24 August 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Vijay-Led TVK Announces Massive Expansion Ahead of 2026 Tamil Nadu Elections". Hindusthan Samachar. 13 February 2025. 26 May 2025 रोजी पाहिले.
- ↑ Kumar, Mayank (16 April 2025). "U.P. cleric issues fatwa against Vijay, asks Muslims to distance themselves from TVK chief". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 27 April 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Fatwa issued against Thalapathy Vijay sparks controversy ahead of 'Jana Nayagan' release". The Times of India. 17 April 2025. ISSN 0971-8257. 27 April 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Fatwa issued against actor Vijay over controversial iftar party". The Times of India. 17 April 2025. ISSN 0971-8257. 27 April 2026 रोजी पाहिले.
- ↑ "TVK Karur rally stampede: Death toll climbs to 41". The Hindu. 29 September 2025. ISSN 0971-751X. 29 September 2025 रोजी पाहिले.
- ↑ C. Jaisankar (27 September 2025). "At least 39 dead in stampede at actor Vijay's rally in Karur". The Hindu. ISSN 0971-751X. 29 September 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Karur stampede: TVK chief Vijay expresses grief, announces ₹20 lakh compensation". The Hindu. 28 September 2025. 28 September 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Vijay announces ₹20 lakh for kin of Karur stampede victims, ₹2 lakh for injured". The Hindustan Times. 28 September 2025. 28 September 2025 रोजी पाहिले.
- ↑ "A month after Karur stampede, TVK chief Vijay meets families of victims at Mamallapuram resort". The Hindustan Times. 27 October 2025. 2025-10-27 रोजी पाहिले.
- ↑ Madhav, Pramod (27 October 2025). "TVK chief Vijay meets Karur stampede victims' families at Mamallapuram resort". India Today. 27 October 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Supreme Court orders CBI probe into Karur stampede, constitutes retired judge-led Oversight Panel". Supreme Court Observer. 14 October 2025. 1 January 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Karur stampede case: CBI again summons TVK president Vijay on January 19". The Hindu. 13 January 2026. 26 January 2026 रोजी पाहिले.
- ↑ "TVK supporters target media outlets online, draw ire". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2026-03-04. ISSN 0971-751X. 2026-04-28 रोजी पाहिले.
- ↑ "TVK chief Vijay makes string of promises for women, gold for marriage, monthly aid of Rs 2,500". The Tribune. 7 March 2026. 8 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Vijay Unveils Major Women-Centric Welfare Promises at TVK Women's Day Celebrations". News Today. 7 March 2026. 8 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ "TVK's Vijay announces free sanitary pads, smart panic buttons and more as poll promise". ANI News. 7 March 2026. 8 March 2026 रोजी पाहिले.
- 1 2 3 4 "Tamil Nadu: Vijay announces new office-bearers". Deccan Chronicle. 31 January 2025. 1 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Pondicherry: PMC wins from Bussy, Cassicade constituency". The Times of India. 11 May 2005. 1 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "TVK condemns Sri Lankan navy's 'aggression' on TN fishers, gives aid to boat owner". The New Indian Express. 16 September 2024. 22 October 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Vijay chairs TVK's Special General Committee Meeting in Mahabalipuram". ANI News. 5 November 2025. 1 January 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Ex-IRS officer Arunraj joins Vijay's TVK, gets party post". The Hindu. 6 June 2025. 1 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ Mariappan, Julie (16 February 2017). "31-member Palaniswami cabinet to be sworn in at 4.30pm". The Economic Times. 5 May 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Sengottaiyan, former Tamil Nadu Minister expelled from AIADMK, joins Vijay's TVK". The Hindu. 26 November 2025. 26 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "As expelled Sengottaiyan joins Vijay's TVK, what's at stake for AIADMK?". India Today. 29 November 2025. 11 December 2025 रोजी पाहिले.
- 1 2 "TVK general council meeting grants Vijay total control over party decisions". South First. 28 March 2025. 1 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Nanjil Sampath appointed as TVK's campaign secretary". The Times of India. 7 December 2025. 7 December 2025 रोजी पाहिले.