तनोट माता मंदिर
Hindu temple in Rajasthan, India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | राजस्थान, भारत | ||||
![]() | |||||
| |||||
तनोट माता मंदिर हे राजस्थान मधील जैसलमेर जिल्ह्यातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर पाकिस्तानच्या सीमेजवळ असून १९७१ मधील भारत-पाकिस्तान मधील तिसऱ्या युद्धातील लोंगेवालाची लढाई याच मंदिराजवळ झाली होती. तत्कालीन लोककथेनुसार या मंदिरातील देवीमुळे सदरील युद्धात भारताला विजय मिळाला होता.[१][२]
इतिहास
[संपादन]पारंपारिक इतिहासकार चरण यांच्या नोंदीनुसार, हिंगलजा मातेचा पुनर्जन्म तनोट माता म्हणून झाला होता. अनेक वर्षांपूर्वी मामदजी उर्फ मामडिया चरण नावाची एक निपुत्रिक व्यक्ती होती. मूल होण्यासाठी मामदजी जवळजवळ सात वेळा हिंगलजा मातेच्या दर्शनाला पायी चालत गेले होते. एके रात्री, जेव्हा हिंगलजा मातेने स्वप्नात मामडिया चरण यांना विचारले, तुम्हाला मुलगा हवा आहे की मुलगी, तेव्हा चरण म्हणाले की तुम्ही स्वतः माझ्या घरी जन्म घ्यावा. हिंगलजा मातेच्या कृपेने त्या घरात सात मुली आणि एका मुलगा अशी एकूण आठ अपत्ये जन्माला आली होती. यापैकी एक आवद माता होती. याच आवद मातेला नंतर तनोट माता म्हणून ओळखले जाऊ लागले.
८२८ मध्ये भाटी राजपूत राजा तनु राव यांनी हे मंदिर बांधून त्यात तनोट देवतेची मूर्ती स्थापित केली.[३] तेव्हापासून, भाटी राजपूत आणि जैसलमेरचे लोक पिढ्यानपिढ्या या मंदिराची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात.[४]
१९६५ च्या भारत-पाकिस्तान मधील दुसऱ्या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने तनोटवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सदरील मंदिरावर ३,००० बॉम्ब डागण्यात आले होते. तथापि एकतर या बॉम्बचा निशाणा चुकला होता किंवा त्यांचा स्फोट झालाच नाही.[५] १९६५ च्या युद्धानंतर, भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) सदरील मंदिराच्या व्यवस्थापन आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी घेतली.[६] त्यानंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या तिसऱ्या युद्धादरम्यान तनोटवर पुन्हा हल्ला झाला होता. परंतु यावेळी हल्ला करणारे रणगाडे वाळूत अडकले, होते. ज्यामुळे भारतीय हवाई दलाला त्यांचा नाश करणे सोपे झाले होते.[४][५] १९७१ च्या युद्धानंतर, भारतीय सैन्याने लोंगेवालाच्या लढाईतील विजयाचे स्मरण म्हणून सदरील मंदिराच्या आवारात विजय स्तंभ बांधलेला आहे.[६] भारतीय सैन्याच्या केवळ १२० पायदळ सैनिकांच्या एका कंपनीने २००० पाकिस्तानी सैनिकांच्या तुकडीचा पराभव केला, ज्यामध्ये पाकिस्तानी टँक स्क्वॉड्रन देखील होते.
युद्धभूमी स्मारक
[संपादन]१९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या विजयानंतर, भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंदिराचा अजून विस्तार केला, विजयी मनोरा आणि न फुटलेले पाकिस्तानी बॉम्ब आणि रणगाडे असलेले युद्ध संग्रहालय तेथे बांधले. दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस या मंदिरात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
तनोट मंदिर आणि युद्ध स्मारक संग्रहालय हे आता भारतीय लष्कराच्या भारत रणभूमी दर्शन या उपक्रमाचा भाग आहेत. यामुळे सीमा पर्यटन, देशभक्ती, स्थानिक पायाभूत सुविधा तसेचअर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि या दुर्गम ठिकाणांहून नागरिकांचे बाह्य स्थलांतर रोखले जाईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यामध्ये सीमावर्ती भागात ७७ युद्धभूमी युद्ध स्मारके आहेत ज्यात लोंगेवाला युद्ध स्मारक, साधेवाला युद्ध स्मारक, सियाचीन बेस कॅम्प, कारगिल, गलवान, पँगोंग त्सो, रेझांग ला, डोकलाम, बम ला, चो ला, किबिथू इत्यादींचा समावेश आहे.

स्थान
[संपादन]हे मंदिर जैसलमेर शहरापासून सुमारे १२२ किलोमीटर (७६ मैल) अंतरावर आहे. येथे वाहनाने पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. सरासरी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने या भागात मोठ्या संख्येने पवनचक्की-आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्प आहेत. तनोटला जाणारा रस्ता दूरदूर पर्यंत वाळूच्या ढिगाऱ्यांनी/पर्वतांनी वेढलेला आहे. हे ठिकाण भारतातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. प्रखर उन्हाळ्यात या भागातील तापमान ४९ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. वर्षातील सर्वात उष्ण दिवसांमध्ये °C. ५२.४ पर्यंत तापमान;या भागात २ मे २०१६ रोजी °C तापमानाची नोंद झाली आणि हे भातातील सर्वाधिक तापमान आहे.
लोकप्रिय संस्कृतीत
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Col J Francis (Retd) (30 August 2013). Short Stories from the History of the Indian Army Since August 1947 (इंग्रजी भाषेत). Vij Books India Pvt Ltd. p. 95. ISBN 978-93-82652-17-5.
- ↑ "Miracle temple offers 'strength' to soldiers" Check
|url=value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). रीडिफ.कॉम. 19 June 2002. 20 August 2019 रोजी पाहिले.[permanent dead link] - ↑ "A temple in Rajasthan that protects jawans in border". Orissa Post (इंग्रजी भाषेत). 3 March 2019.
- 1 2 Bhandari, Prakash (4 October 2015). "Of a deity and the line of duty". The Statesman (इंग्रजी भाषेत).
- 1 2 "You saw it in Border: A temple amid the dunes feeds barracks lore". New Indian Express (इंग्रजी भाषेत). 18 August 2017.
- 1 2 Dabas, Maninder (6 July 2017). "Here Is The Story Of Tanot Mata, The Deity Who Protected Indian Soldiers From Pakistani Bombs At Longewala In 1971 War". India Times (इंग्रजी भाषेत).
