तनिष्क अब्राहम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


तनिष्क अब्राहम (जन्म : सॅक्रामँटो, कॅलिफोर्निया, इ.स. २००४) हा मूळ भारतीय वंशाचा एक अमेरिकन मुलगा आहे. त्याचे वडील बिजोऊ अब्राहम हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर आई डॉ. ताजी या पशुवैद्यकशास्त्राच्या पदवीधर आहेत. मूळचे केरळचे रहिवासी असलेले हे दांपत्य इ.स. २००५ साली अमेरिकेत आले.

शिक्षण[संपादन]

तनिष्क सुरुवातीला घरी राहूनच अभ्यास करीत असे. आईवडील हेच त्याचे शिक्षक होते. २००८ सालापासून तो रिव्हर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

अध्यापन[संपादन]

तनिष्क अब्राहम हा याच्या सहाव्या वर्षांपासूनच हायस्कूल तसेच महाविद्यालयीन स्तरावरचे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र यांसारख्या जटिल विषयांचे ऑनलाइन वर्ग घेत होता.

बुद्ध्यांक[संपादन]

तनिष्कचा बुद्ध्यांक इतक्या उच्च दर्जाचा आहे की वयाच्या चौथ्या वर्षीच त्याला अमेरिकेतील अफलातून बुद्ध्यांक असणार्‍या लोकांच्या ’मेन्सा इंटरनॅशनल’ नावाच्या जगप्रसिद्ध संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.

पदविका आणि पदव्या[संपादन]

२०१४ मध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी तनिष्कने पदविका मिळविली. तेव्हा त्याचे खूप कौतुक झाले. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वत: पत्र पाठवून त्याचे अभिनंदन केले होते. २० मे २०१५ रोजी रिव्हर महाविद्यालयात पदवीदान समारंभात सुमारे १८०० तरुणांसमवेत तनिष्कचे नाव पुकारले गेले.. गणित, विज्ञान आणि विदेशी भाषा अशा तीन विषयांत तो पदवीधर झाल्याची घोषणा झाली. रिव्हर महाविद्यालयातून पदवी मिळवणारा सर्वात कमी वयाचा म्हणजे केवळ ११ वर्षे वयाचा विद्यार्थी म्हणून तनिष्कच्या नावाची नोंद झाली.