ढेकूण आणि मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अ विश्वकोशीय मजकूर, उत्पात

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

लेख -

ढेकूण आणि मी

  पूर्वी पासूनचं जमिनीवर झोपण्याची सवय न्हवती त्यामुळे जुन्या लाकडांची तिघांना हात लावून उचलता न यावी एवढी वजन अशी खाटली हाच रोजच्या निवांत निद्रेचा अविभाज्य भाग होता.

तुम्ही गाढ झोपलात आणि रात्रीचे अंदाजे दीड ते अडीच च्या सुमारास जागे होऊन लाईट लावून पाहिली की किमान 15 ते 16 ढेकूण तुमच्या विछान्यामध्ये दिसत. त्यांना समजले की शत्रू पक्षाला जाग आली आहे आणि तो आता दाबण किंवा सुई या धारधार शस्त्राने आपली कत्तल करेल की मग ते सैरावैरा पळत सुटत दर रोज कुण्या सैन्य छावणीत शिकून आल्यासारखे. त्यांच्यामुळे चादर, गोधड्या, उश्या, विछाने इतके स्वच्छ धुतले होते की आठवड्यामधून तीन 555 साबण संपायचे. खाटलीला 200℃ डिग्री तापलेल्या पाण्याने अंघोळी घातल्या, कीटकनाशक फवारणी केली, टिक 20 नमक घातक द्राव्यही एकदा फवारले होते त्यावेळी मेडिकल मधील व्यक्तीने मी कॉलेजमध्ये आहे म्हणून स्वतः पिणार आहे की काय म्हणून पुरावा म्हणून रेशनकार्ड झेरॉक्स आणि त्यावर लेखी लिहून मागितले होते की, हे ढेकूण पळवण्यासाठी विकत घेतले आहे. तीन - चार वेळा तर रॉकेल ही फवारले होते फक्त त्यानंतर ती खाटली पेटवणे बाकी होते. सुगरणीच्या घरट्याहुन अधिक रेखीव विणलेल्या अश्या त्या सुंभाच्या दोऱ्या त्यामध्ये त्या ढेकणांचा आशियाना होता. ढेकूण कुठून येतं होते हे कधीच मला आणि त्या खाटलीलाही कळले नाही. खाटली तुटली पण ते ढेकूण शेवटपर्यंत गेले नाहीत. आता ढेकूण नावही गेली चार-पाच वर्षे सहसा कानावर पडलं नाही. त्यांनाही कळलं बहुदा आता जाड कातडीची असंवेदनशील माणसं जागी राहून गाढ झोपतात.

- चेतन किशोर ठाकुर (अर्थातचं)