Jump to content

डोनल बिष्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ڈونل بیشت; ডোনাল বিষ্ট; Donal Bisht; ڈونل بیشت; Donal Bisht; डोनल बिष्ट; ଡୋନାଲ ବିଷ୍ଟ; Donal Bisht; ڈونل بیشت; Donal Bisht; Donal Bisht; डोनल बिष्ट; డోనాల్ బిష్ట్; Donal Bisht; Donal Bisht; ਡੋਨਲ ਬਿਸ਼ਟ; Donal Bisht; Donal Bisht; অভিনেত্রী; بہتری اداکارہ; акторка; actrice uit Indian people; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; actor; indische Schauspielerin; ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ; actor; դերասան; actores a aned yn 1994; भारतीय अभिनेत्री; شرانیا بیشت/رادھیکا، پریہ اور اشکا روپیش پٹیل
डोनल बिष्ट 
actor
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑगस्ट २७, इ.स. १९९४
उत्तराखंड
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१५
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q27967745
आय.एम.डी.बी. दुवा: nm9431012
विकिडाटावर माहिती संपादित करा

डोनल बिष्ट (जन्म २७ ऑगस्ट १९९४) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. सोनी टीव्हीच्या एक दीवाना था या नाट्य मालिकेतील शरण्या बिष्ट आणि कलर्स टीव्हीच्या रूप - मर्द का नया स्वरूप मधील इशिका पटेल या भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. २०२१ मध्ये, तिने बिग बॉस १५ मध्ये भाग घेतला होता. २०१९ मध्ये, बिष्ट टाइम्सच्या "मोस्ट डिझायरेबल वुमन ऑन टीव्ही" यादीत १८ व्या क्रमांकावर होती.[]

बालपण

[संपादन]

डोनलचा जन्म २७ ऑगस्ट १९९८ रोजी राजस्थानमधील अल्वर येथे जयसिंग आणि जसुमती बिष्ट यांच्या घरी झाला, तर तिचे मूळ गाव उत्तराखंड मधील आहे. तिला रंजन बिष्ट नावाचा एक मोठा भाऊ आहे.

कारकीर्द

[संपादन]

तिने न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम केले आणि ती डीडी नॅशनलच्या चित्रहार या कार्यक्रमाची अँकरही होती. तिने २०१५ मध्ये एरलाइन्स या मालिकेत एका पत्रकाराच्या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले.[] त्याच वर्षी, तिने हर्षित अरोरासोबत ट्विस्ट वाला लव्ह या अँथॉलॉजी मालिकेत डॉ. शेली गायतोंडेची भूमिका साकारली.[]

२०१५ ते २०१७ पर्यंत, तिने कलश-एक विश्वास मध्ये साक्षी देओल गरेवालची भूमिका साकारली.[] ही तिची पहिली प्रमुख पडद्यावरील भूमिका होती. ती ए जिंदगी च्या एका भागात प्रियांकाच्या भूमिकेतही दिसली होती.

बिष्टला एक दीवाना था या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली, जिथे तिने २०१७ ते २०१८ या काळात नामिक पॉल आणि विक्रम सिंह चौहान यांच्यासोबत शरण्या बिष्टची भूमिका साकारली.[] ही मालिका २०१८ मध्ये संपली.[] २०१८ मध्ये, ती मृणाल जैनसोबत लाल इश्कच्या एका एपिसोडमध्ये रियाच्या भूमिकेत दिसली.[]

२०१८ ते २०१९ पर्यंत, तिने शशांक व्यासच्या विरुद्ध रूप - मर्द का नया स्वरूप मध्ये इशिका पटेल या एका हट्टी मुलीची भूमिका साकारली.[][] २०१९ मध्ये, तिने दिल तो हॅप्पी है जी मध्ये जास्मिन भसीनच्या जागी हॅप्पी मेहराची भूमिका साकारली.[१०] तिने अंश बागरीच्या विरुद्ध ही भूमिका साकारली. हा शो त्याच वर्षी संपला.[११]

ऑक्टोबर २०२१ मध्ये, तिने बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला; पण १८ व्या दिवशी घरातील सदस्यांनी तिला घराबाहेर काढले.[१२]

बिष्ट डेअर टू स्लीप या द्विभाषिक चित्रपटातून तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे, ज्यात ती चेतन कुमारच्या विरुद्ध दिसणार आहे.[१३] ती ॲमेझॉन एमएक्स आणि प्राईमच्या तू जख्म है या वेब सीरिजमध्ये गश्मीर महाजानीसोबत दिसली होती.[१४]

पुरस्कार नामांकने

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी मलिका निकाल संदर्भ.
२०१८ सुवर्ण पुरस्कार सर्वोत्कृष्ट जोडी ( नामिक पॉल सोबत) एक दीवाना था नामांकन [१५]
२०१९ सर्वात फिट अभिनेत्री (महिला) नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Meet TV's most desirable actresses of 2019". The Times of India (इंग्रजी भाषेत). 16 May 2019. 13 March 2021 रोजी पाहिले.
  2. "Airlines: A real life journalist enters the show". The Times of India. 5 January 2015.
  3. "Harshith Arora and Donal Bisht to feature in Channel V's Twist Wala Love". Telly Chakkar. 6 June 2015.
  4. Maheshwari, Neha (18 July 2015). "Donal Bisht replaces Shritama in Kalash-Ek Vishwaas". The Times of India (इंग्रजी भाषेत). 12 January 2021 रोजी पाहिले.
  5. Iyengar, Anusha (24 October 2017). "Ek Deewaana Tha review: Namik Paul, Donal Bisht and Vikram Singh Chauhan horror love story starts off with clichés but looks promising". Bollywood Life. 24 October 2017 रोजी पाहिले.
  6. "This is when Namik Paul and Donal Bisht's Ek Deewaana Tha will go off air". India Today (इंग्रजी भाषेत). Ist. 2019-08-13 रोजी पाहिले.
  7. "Donal Bisht joins Mrunal Jain for an episode of &TV's Laal Ishq". IWM Buzz. 19 June 2018.
  8. "Donal Bisht: Looking back, I feel like I've made a strong impact with my role as Ishika in Roop". Times Of India. 9 October 2020.
  9. "TV show 'Roop — Mard Ka Naya Swaroop' to end next month". The Times of India (इंग्रजी भाषेत). 16 April 2019. 2019-05-05 रोजी पाहिले.
  10. Maheshwari, Neha (19 January 2019). "Donal Bisht steps into Jasmin Bhasin's shoes to play Happy in 'Dil Toh Happy Hai Ji'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 March 2021 रोजी पाहिले.
  11. "Donal Bisht disappointed with abrupt ending of Dil Toh Happy Hai Ji: It's heartbreaking". India Today. 17 July 2019. 17 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  12. "Bigg Boss 15 Day 1 Highlights: Ieshaan is First Nominated Contestant, Donal Termed Manipulative". News 18. 2021-10-04.
  13. "Donal Bisht shares a BTS pic with Sunil from the sets of DTS in Goa". Times Of India. 17 August 2021.
  14. "Exclusive! Gashmeer Mahajani and Donal Bisht roped in for MX player's next Zakhm". Tellychakkar. 11 March 2022. 25 April 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2022 रोजी पाहिले.
  15. "Zee Gold Awards 2018: Jennifer Winget, Mouni Roy, Hina Khan, Ravi Dubey, Nakuul Mehta win big honours". The Indian Express. June 20, 2018.