Jump to content

डॉ. बी.एम.एन. कॉलेज ऑफ होम सायन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. बी.एम.एन कॉलेज ऑफ होम सायन्स हे महिला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय आहे. महेश्वरी उद्यान, माटुंगा येथे अरोरा चित्रपट गृहाच्या मागे हे महाविद्यालय आहे. होम सायन्सच्या पदवी बरोबरच संगणक, कायदा, नर्सिंग, उपयोजित कला इत्यादी अनेक अभ्यासक्रमांचे येथे शिक्षण दिले जाते. त्याच बरोबर कनिष्ट महाविद्यालय याच संकुलात आहे. विद्यार्थिनींसाठी १७ प्रकारच्या सेवा सुविधा येथे आहेत. यामध्ये उपहार गृह, ग्रंथालय, सुसज्ज प्रयोग शाळा, स्मार्ट फळे त्याच बरोबर राष्ट्रीय सेवा योजना, आंतर महाविद्यालयीन उत्सव (आकांशा, टेकझोन) व क्रीडा इत्यादी विविध उपक्रमातून मुलींचा व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकास केला जातो. संकुलामध्ये डॉक्टर तसेच सल्लागार उपलब्ध असतात. नॅक अ दर्जा (3.६४/ ४ ) मिळालेला आहे.