डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे विचारमंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे(१९०४-१९८५) यांनी पुण्याच्या सुप्रसिद्ध नू.म.वि.प्रशालेतील एक शिक्षक  व नंतर एस.पी.कॉलेजातील एक निष्णात प्राध्यापक असा फार मोठा लौकिक मिळविला होता. मराठीतील पहिलेच पीएच.डी.; प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, वर्गात कमालीची शिस्त राखणारे, व्रतस्थ वृत्तीचे, व्यासंगी, तळमळीचे शिक्षक;  शिक्षकाचा पेशा हे एक व्रत आहे - विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणे, त्यांना उत्तम नागरिक बनविणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे शिक्षकांचे कार्य होय, अशी ध्येयनिष्ठा रक्तात भिनलेले, खर्‍या अर्थाने लोकशिक्षक या पदवीस पात्र असलेले अध्यापक; शिक्षकांनी सतत वाचन, लेखन, मनन, चिंतन करून  आपल्या ज्ञानाची उंची वाढवीत राहिली पाहिजे व त्यासाठी आजन्म विद्यार्थी राहिले पाहिजे, असा आग्रह धरणारे व त्याप्रमाणे आचरण करणारे अध्यापक आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षांसाठी कसोशीने उत्कृष्ट तयारी करून घेणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्याचवेळी बृहन्महाराष्ट्रात प्रभावी वक्ते म्हणून व विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, आगरकर, लो. टिळक, श्री. म. माटे इ. तत्त्वचिंतकांच्या मालिकेतील विचारप्रवर्तक निबंधकार म्हणूनही त्यांनी मानाचे स्थान मिळविले होते. शिक्षक, वक्ते, निबंधकार या तिन्ही नात्यांनी त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्व समाजाला समाजकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, अर्थकारण, लोकसत्ता, समाजवाद इ. विषयांसंबधींचे आपले मौलिक विचारधन मुक्तहस्ताने वाटले. ते करीत असताना राष्ट्राचे कल्याण हाच हेतू त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला होता. तरुण पिढीला त्यांनी दीर्घकाळ जे वैचारिक मार्गदर्शन केले, ते आजही तितकेच उपयुक्त ठरेल अशी खात्री वाटते. आज भारतीय समाजाची नैतिक पातळी इतकी खालावलेली आहे की या गोष्टीची विशेष आवश्यकता वाटते. परंतु आज त्यांची पुस्तके उपलब्ध नाहीत व नव्या पिढीला तर त्यांच्या कार्याचा परिचयही नाही. तो परिचय करून देण्यासाठी व त्यांचे सर्व विचारधन वाचकांना, विशेषत: तरुणांना, विद्यार्थ्यांना, निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी  मी ‘डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे विचारमंच’ https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.

माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आपण या संकेतस्थळाची आपल्या परिचयातील सर्व व्यक्तींना, तरुणांना, विद्यार्थ्यांना, शिक्षणसंस्थांना, वाचनालयांना माहिती द्यावी आणि पुगस यांच्या विचारधनाचा जास्तीत जास्त प्रसार करून त्याअन्वये समाजकार्यासाठी व राष्ट्रकार्यासाठी हातभार लावावा. तसेच या विषयावरील आपल्या बहुमूल्य सूचनाही आपण मला अवश्य कळवाव्या.

पुगस यांचे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले सर्व साहित्य मी या संकेतस्थळावर दिले आहे. परंतु त्यांचे इतर अनेक मासिकांत प्रसिद्ध झालेले लेख, कथा उपलब्ध नाहीत. जर कोणी हे साहित्य मला मिळवून दिले तर मी त्यांचा ऋणी होईन व तेही या संकेतस्थळावर साभार सादर करीन.

आपला स्नेहांकित,

सुहास वसंत सहस्रबुद्धे.

"पूर्वेश", स.क्र. १६, गणेश नगर, वडगाव धायरी, 

पुणे ४११०४१. 

भ्रमणध्वनी – ८१४९१९५३९५.