डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स
डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या आणि एकोणिसाव्या शतकात आपली भारतातील मांडलिक संस्थाने बळकावण्यासाठी लावलेले धोरण होते. हे धोरण पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मोठे कारण होते आणि हे युद्ध संपल्यानंतर एक वर्ष, १८५८ पर्यंत लागू होते.
भारतीय उपखंडात ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानांसाठी सुरू केलेले विलीनीकरणाचे धोरण म्हणजे लॅप्सचा सिद्धांत होता आणि १८५८ पर्यंत, कंपनी राजवट नंतर ब्रिटिश राजवटीने ब्रिटिश राजवट स्थापन केल्याच्या एका वर्षापर्यंत तो लागू होता.
हे धोरण डलहौसीच्या पहिले मार्क्वेस जेम्स ब्राउन-रॅमसे तथा लॉर्ड डलहौसीने अधिक प्रमाणात वापरणे सुरू केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सरकारने १९७१ पर्यंत हे धोरण पुनः वापरले आणि त्याद्वारे अनेक संस्थाने भारतीय प्रजासत्ताकात शामिक करून घेतली. १९७१मध्ये इंदिरा गांधी सरकारने भारतीय संविधानातील २५ व्या दुरुस्ती अंतर्गत उरलेली सगळी संस्थाने विलीन करून घेतली.
या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखालील कोणत्याही भारतीय संस्थानाचा राजा कंपनीच्या मतेस्पष्टपणे अक्षम असेल किंवा पुरुष वारसाशिवाय मरण पावला असेल, तर ते संस्थान थेट ब्रिटिश भारतात सामील केले जात असे. यामुळे वारस नसलेल्या संस्थानिकांना दत्तक घेउन आपला वंश व सत्ता पुढे चालू ठेवणे अशक्य झाले. [१]
या धोरणाचा वापर करून वापर करून, कंपनीने सातारा (१८४८), जैतपूर, संबलपूर (१८४९), बाघल (१८५०), उदयपूर (छत्तीसगड) (१८५२), झाशी (१८५४), नागपूर (१८५४), तंजोर आणि आर्कोट (१८५५) ही संस्थाने ताब्यात घेतली. अवध (१८५६) हे या धोरणांतर्गत विलीन झाले असे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते डलहौसीने गैरशासनाच्या बहाण्याने विलीन केले होते. या धोरणाद्वारे कंपनीने आपल्या वार्षिक महसुलात सुमारे चाळीस लाख पौंडांची भर घातली. १८६० मध्ये उदयपूर संस्थान पुन्हा स्थापित केले गेले.
ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाने भारतातील जनतेत असंतोष पसरला. यात ब्रिटिश नोकरीत असलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश होता. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे हे एक मोठे कारण समजले जाते. या युद्धानंतर १८५८ ब्रिटिश व्हाईसरॉयने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन काढन घेतले व त्यावेळी हे धोरण रद्द केले.
या धोरणाखाली खालसा झालेली संस्थाने
[संपादन]
संस्थान | खालसा झालेले वर्ष |
---|---|
अंगुल | १८४८ |
आर्कोट | १८५५ |
अवध | १८५६ |
अहोम | १८३८ |
बांदा | १८५८ |
गुलेर | १८१3 |
Jaintia | 1803 |
Jaitpur | १८४9 |
Jalaun | १८४0 |
Jaswan | १८४9 |
Jhansi | १८५३ |
कचर | १८३० |
कांगडा | १८४६ |
Kannanur | १८१9 |
Kittur | १८२4 |
Ballabhgarh | १८५8 |
Kullu | १८४6 |
Kurnool | १८३9 |
Kutlehar | १८२5 |
Nagpur | १८५3 |
Punjab | १८४9 |
Ramgarh | १८५8 |
Sambalpur | १८४9 |
Satara | १८४8 |
Surat | १८४2 |
Siba | १८४9 |
Tanjore | १८५5 |
Tulsipur | १८५4 |
Udaipur | १८५2 |
स्वतंत्र भारतातील धोरण
[संपादन]१९६४ च्या शेवटी सिरमूर राज्याचे शासक राजेंद्र प्रकाशचे निधन झाले तेव्हा त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांच्या ज्येष्ठ विधवेने त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले. भारत सरकारने हे मान्य केले नाही आणि सिरमूरला भारतीय प्रजासत्ताकात विलीन करून घेतले. अक्कलकोट राज्याच्या राज्यातही हेच धोरण वापरले गेले. [२]
संदर्भ
[संपादन]- ^ Majumdar, RC (1957). The Sepoy Mutiny and The Revolt of 1857. Calcutta: Srimati S. Chaudhuri. p. 7. 5 June 2022 रोजी पाहिले.
- ^ Succession to the Gaddis of Sirmur and Akalkot (Report). Government of India. 1967. 13 September 2021 रोजी पाहिले.