Jump to content

डेव्हिड बाल्टिमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड बाल्टिमोर
पूर्ण नावडेव्हिड बाल्टिमोर
जन्ममार्च ८, १९३८
न्यूयॉर्क,अमेरिका.
मृत्यूसप्टेंबर ६, २०२५ (८७ वर्षे)
अमेरिका
निवासस्थानअमेरिका
नागरिकत्वअमेरिकन
राष्ट्रीयत्वअमेरिकन
वांशिकत्वज्यू
धर्मज्यू
कार्यक्षेत्रजैवतंत्रज्ञान
कार्यसंस्थाएम आय टी
प्रशिक्षणरॉकफेलर विद्यापीठ, अमेरिका.
डॉक्टरेटचे मार्गदर्शकरिचर्ड फ्रँकलिन
पुरस्कार नोबेल पारितोषिक

डॉ. डेव्हिड बाल्टिमोर हे जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

जीवन व कारकीर्द

[संपादन]
  1. डेव्हिड बल्टिमोर यांचा जन्म ८ मार्च, १९३८ रोजी अमेरिका देशातील न्यू यॉर्क येथे एका युरोप मधील लिथुयानिया देशातून स्थलांतरित झालेल्या धार्मिक,कर्मठ,ज्यू कुटुंबात झाला.
  2. आई वडील यांनी त्याच्यावर कट्टरतेचे संस्कार केले नव्हते.
  3. वडील कॉलेजमध्ये गेले नव्हते परंतु शिक्षणाचे महत्त्व समजणाऱ्या आईचा त्यांच्यावर फार प्रभाव झाला होता.
  4. शालेय शिक्षण त्यांच्या कुशाग्र बुद्धिमुळे त्यांच्या वर्गमित्र आणि शिक्षक यांच्या नजरेत भरले.
  5. इसवी सन १९६४ साली त्यांनी रॉकफेलर विद्यापीठ येथून रिचर्ड फ्रँकलिन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीपेशीत वाढणारे विषाणू या विषयात संशोधन करून पीएचडी प्राचीन केली.
  6. ह्याच रॉकफेलर विद्यापीठ संस्थेचे पुढे ते अध्यक्षही झाले.
  7. इसवी सन १९६८ मध्ये ते मॅसेच्यूसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्राध्यापक झाले.
  8. ४ मे १९७० साली त्यांनी एमआयटीच्या प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून काही विषाणू मध्ये (राउशर म्युरिन ल्युकेमिया व्हायरस) आरएनए वरून डीएनए तयार करण्याची क्षमता आहे हे सिद्ध केले.
  9. येथेच नवीन एन्झायमचा शोध लागला ज्याला एन्झायम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे नाव देण्यात आले.
  10. एकट्याने केलेला हा शोध नेचर या नियतकालिकामध्ये त्यांच्या एकट्याच्या नावाखाली शोधनिबंध म्हणून पुढच्या महिन्यात प्रसिद्ध झाला.
  11. वयाच्या ३२ व्या वर्षी लावलेल्या या वर दिलेल्या शोधासाठी इसवी सन १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.
  12. इसवी सन १९८२ मध्ये त्यांनी एमआयटी या संस्थेतच व्हाईटहेड इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च ही संस्था स्थापन केली.त्या संस्थेचे ते फाउंडर डिरेक्टर होते.एमआयटी संस्थेने १०५ नोबेल विजेते दिले आहेत.
  13. इसवी सन १९९७ ते २००६ पर्यंत ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेने ४८ नोबेल विजेते शास्त्रज्ञ दिले आहेत.
  14. डेव्हिड बल्टिमोर या महान शास्त्रज्ञाचे वर्णन खालील प्रमाणे केले जाते :-

अलौकिक बुद्धिमत्तेचा धनी, जगातील सर्वोच्च नोबेल पारितोषिक मिळवणारा महान शास्त्रज्ञ, प्रयोगशाळेत स्वतःच्या हाताने प्रयोग करण्यात प्रचंड आनंद मिळविणारा, अनेक उद्योगांना मार्गदर्शन व सल्ला देणारा सल्लागार, त्यांच्या पिढीतील सर्वांत प्रभावशाली जीवशास्त्रज्ञ, शिक्षण व संशोधन संस्थात सर्वोच्च पदे भूषवणारा समर्थ प्रशासक, हस्तिदंती मनोऱ्यात न राहता जनजागृती करणारा, स्वतःची मते निर्भीडपणे मांडणारा, वेळेनुसार सरकार विरोधी निषेध मोर्चात सामील होणारा, असा हा शास्त्रज्ञ.

नोबेल पारितोषिक विजेते

[संपादन]

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाबद्दल त्यांना इसवी सन १९७५ साली नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ==मृत्यू==

दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी डेव्हिड बल्टिमोर या महान शास्त्रज्ञाचे वयाच्या ८७ व्या वर्षी कँन्सर या व्याधीने निधन झाले.[१]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ↑ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,१३ सप्टेंबर २०२५.लेखन-बिपीन देशमाने-जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ.