डॅनी आल्वेस
Appearance
दानियेल मिगेल आल्वेस गोमेझ उर्फ डॅनी (पोर्तुगीज: Daniel Miguel Alves Gomes; ७ ऑगस्ट, १९८३ , काराकास, व्हेनेझुएला) हा एक पोर्तुगीज फुटबॉलपटू आहे. २००८ पासून पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा भाग असलेला डॅनी २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पोर्तुगालसाठी खेळला होता. क्लब पातळीवर डॅनी २००२-०५ दरम्यान स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल, २००५-०९ दरम्यान रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. डायनॅमो मॉस्को तर २००८ पासून एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत