डहाणू औष्णिक विद्युत केंद्र
Appearance
डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम बीएसईएस लिमिटेड यांनी केले आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बीएसईएसच्या स्वाधीन केले. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी हा प्रकल्प चालवीत आहे. प्रकल्प मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर असून, मुंबईपासून १२० किमी अंतरावर आहे आणि मुंबई-अहमदाबाद-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ८ (भारत)पासून २० किमी अंतरावर आहे.
क्षमता
[संपादन]डहाणू औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट (२x२५० मेगावॅट) आहे. १९९५मध्ये हे विद्युत केंद्र सुरू झाले आणि १९९६पासून व्यावसायिकपणे वीज निर्मिती केली जात आहे.[१]
युनिट क्रमांक | क्षमता | आरंभण तारीख | स्थिती |
---|---|---|---|
१ | २५० मेगावॅट | १९९५ जानेवारी | सक्रिय |
२ | २५० मेगावॅट | १९९५ मार्च | सक्रिय |