Jump to content

डब्ल्यू.जे.एम. रँकिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम जॉन मॅक्वॉर्न रँकिन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र संपादन
स्थानिक भाषेतील नावWilliam John Macquorn Rankine संपादन
दिलेले नावविल्यम, जॉन संपादन
आडनावRankine संपादन
जन्म तारीख५ जुलै 1820 संपादन
जन्मस्थानएडिनबरा संपादन
मृत्यू तारीख२४ डिसेंबर 1872 संपादन
मृत्यूस्थानग्लासगो संपादन
चिरविश्रांतीस्थानSighthill Cemetery संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभियंता, भौतिकशास्त्रज्ञ, civil engineer, विद्यापीठातील शिक्षक, संशोधक संपादन
कार्यक्षेत्रअभियांत्रिकी संपादन
नियोक्ताग्लासगो विद्यापीठ, जॉन बेंजामिन मॅकनेल संपादन
पदRegius Professor of Civil Engineering and Mechanics, chairperson संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाएडिनबरा विद्यापीठ, Ayr Academy, Scottish Naval and Military Academy, Glasgow Academy संपादन
कर्मस्थळएडिनबरा, ग्लासगो संपादन
Has works in the collectionAustralian National Maritime Museum संपादन
सदस्यतारॉयल सोसायटी, Royal Swedish Academy of Sciences, American Academy of Arts and Sciences, Royal Society of Edinburgh संपादन
पुरस्कारFellow of the Royal Society, جائزة مُنحت من قبل الجمعية الملكية في إدنبرة, Fellow of the Royal Society of Edinburgh, honorary doctorate of Trinity College, Dublin संपादन
Depicted byProfessor W.J. Macquorn Rankine; (1820-1872) संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

विल्यम जॉन मॅक्वॉर्न रँकिन एफआरएसई एफआरएस (५ जुलै, १८२० - २४ डिसेंबर, १८७२) हे एक स्कॉटिश गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. ते रुडॉल्फ क्लॉसियस आणि विल्यम थॉमसन (लॉर्ड केल्विन) यांच्यासोबत उष्मगतिशास्त्राचे संस्थापक मानले जातात. रँकिन यांनी उष्मागतिकीच्या पहिल्या नियमावर बहुल संशोधक केले. त्यांनी सेल्सियस-आधारित केल्विन स्केलच्या समतुल्य फॅरेनहाइट-आधारित तापमान मोजणारा रँकिन स्केल तयार केला.

रँकिन यांनी वाफेचे इंजिन आणि त्याद्वारे सर्व उष्णता इंजिनांचा संपूर्ण सिद्धांत विकसित केला. १८५० आणि १८६० च्या दशकात प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी लिहिलेली अभियांत्रिकी विज्ञान आणि सराव यावरील नियमावली अनेक दशकांपर्यंत वापरली गेली. १८४० पासून त्यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांवर शेकडो पेपर्स आणि नोंदी प्रकाशित केल्या.

त्यांच्या आवडी अत्यंत वैविध्यपूर्ण होत्या. त्यांच्या तारुण्यात त्यांनी वनस्पतिशास्त्र, संगीत सिद्धांत आणि संख्या सिद्धांत आणि प्रौढावस्थेत विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकीच्या बहुतेक प्रमुख शाखांचा अभ्यास केला.

रँकिन एक गायक, पियानोवादक आणि चेलोवादक तसेच रायफलमन देखील होते. [] []

पूर्वजीवन

[संपादन]

रँकिनचा जन्म एडिनबर्ग येथे डेव्हिड रँकिन यांच्या घरी झाला. डेव्हिड लष्करात काम केलेले सिव्हिल अभियंता होते. त्यांनी नंतर एडिनबर्ग आणि डाल्कीथ रेल्वे (इनोसंट रेल्वे ) मध्ये काम केले. [] [] त्यांची आई बार्बरा ग्रॅहाम एका प्रतिष्ठित कायदेशीर आणि बँकिंग कुटुंबातील होती.

डेव्हिड रँकिनची कामासाठी स्कॉटलंडभर बदली होत असे व त्यांचे कुटुंबही त्यांच्याबरोबर असत. विल्यमच्या नाजूक तब्येतीमुळे सुरुवातीस त्यांना घरीच शिक्षण दिले गेले.[] नंतर त्यांनी एयर अकॅडेमी आणि हाय स्कूल ऑफ ग्लासगो येथे दोन वर्षे शिक्षण घेतले. १८३० च्या सुमारास डेव्हिड यांची डाल्कीथ रेल्वेचे प्रबंधक म्हणून एडिनबरा येथे नेमणूक झाली. तेथे गेल्यावर रँकिन कुटुंब २ आर्निस्टन प्लेस या पत्त्यावर राहत असे.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
विल्यम रँकिन

प्रकाशने

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. विल्यम्स, गॅव्हिन (6 December 2018). Hearing the Crimean War: Wartime Sound and the Unmaking of Sense (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-091677-0.
  2. "Scottish Engineering Hall of Fame". www.engineeringhalloffame.org. Institution of Engineers in Scotland. 9 April 2018 रोजी पाहिले.
  3. "Scottish Engineering Hall of Fame". www.engineeringhalloffame.org. Institution of Engineers in Scotland. 9 April 2018 रोजी पाहिले."Scottish Engineering Hall of Fame". www.engineeringhalloffame.org. Institution of Engineers in Scotland. Retrieved 9 April 2018.
  4. Biographical Index of Former Fellows of the Royal Society of Edinburgh 1783–2002 (PDF). The Royal Society of Edinburgh. July 2006. ISBN 0-902-198-84-X. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2025-12-23 रोजी पाहिले.
  5. Fegley, Bruce; Osborne, Rose (2013). Practical Chemical Thermodynamics for Geoscientists (इंग्रजी भाषेत). Academic Press. ISBN 978-0-12-251100-4.
  6. Edinburgh Post Office Directory 1831