ठेंगोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ठेंगोडा हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव गिरणा नदीच्या काठावर वसले आहे.

गावात गिरणेच्या काठावर श्रीसिध्दीविनायकाचे मंदिर आहे. ब्रिटिश भारतात बागलाण तालुक्याची कचेरी याच गावात होती. त्याची जुनी पडकी इमारत अजूनही अस्तित्वात आहे. गावाच्या पूर्वेस गिरणेवर ब्रिटिश राजवटीत इ.स. १९१९ मध्ये बांधलेला बंधारा आहे. याच बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यातून ‍रावळगांव येथील कारखान्यास पाणीपु‍रवठा होतो.

गावात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब शिंदे यांचे स्मारक आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ठेंगोडा हे नाशिक जिल्हयातील सटाणा (बागलाण) तालूक्यातील गाव आहे. हे गाव मागील ३५ ते ४० वर्षापासून सुतगिरणीमूळे नावारूपास आलेले आहे. गिरणा नदीवर वसलेले हे गाव सटाणा तालूक्याच्या दक्षिणेस असलेले एक महत्त्वपुर्ण गाव असून जिल्हयाच्या ठिकाणापासून ७८ कि.मी. अंतरावर आहे. तसेच सटाणा व देवळा या दोन्ही तालूक्यांच्या मध्यभागी आहे. ठेंगोडा गावाचे ग्रामदैवत सिद्धिविनायक असून पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे. या गावापासून २ कि.मी. अंतरावर वसंतदादा पाटील साखर कारखाना आहे. ठेंगोडा व लोहोणेर ही दोन्ही गावे या तालूक्यातील औद्योगिक नगरी म्हणून उद्यास आली आहेत.