ट्युनिसियाचे फ्रेंच-संरक्षित राज्य
ट्युनिसियाचे फ्रेंच-संरक्षित राज्य الحماية الفرنسية في تونس Protectorat français de Tunisie | ||||
|
||||
|
||||
ट्युनिसिया (गडद निळा) आफ्रिकेतील फ्रेंच प्रदेश (फिकट निळा) १९१३ |
||||
राजधानी | ट्युनिस | |||
शासनप्रकार | संविधानात्मक राजतंत्रीय | |||
अधिकृत भाषा | फ्रेंच, अरबी |
ट्युनिसियाचे फ्रेंच-संरक्षित राज्य (फ्रेंच: Protectorat français de Tunisie; अरबी: الحماية الفرنسية في تونس) हे इ.स. १८८१ ते इ.स. १९५६ दरम्यान अस्तित्वात असलेले फ्रेंच वसाहती साम्राज्याचे एक मांडलिक राज्य होते.
मध्य युगापासून ट्युनिसिया ओस्मानी साम्राज्याचा भाग होता. इ.स. १८७० साली फ्रान्स-प्रशिया युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाला धक्का बसला होता. ओस्मनी साम्राज्याची ठळती ताकद पाहता इटली व ब्रिटनने ट्युनिसिया आपल्या तब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. उत्तर आफ्रिका भागातील अल्जिरिया फ्रेंच वसाहत असल्यामुळे ट्युनिसिया देखील आपल्या अधिपत्याखाली आणण्यात फ्रेंचांना रस होता. ह्यामधूनच ट्युनिसियावरील फ्रेंच आक्रमण घडले ज्यानंतर ट्युनिसिया हे फ्रेंच मांडलिक राज्य बनले.
इ.स. १९६० साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले व ह्या राज्याचा अस्त झाला.