टोप बावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक मुंबई महामार्गावरून जाता-येतांना कसारा घाटात मध्यावर येतांनाच्या बाजूने उजव्या हाताला एक टोपलीच्या आकाराची विहीरआहे, अर्थात पाणी भरलेले असल्यामुळे खोलीच्या अंदाज येत नाही. परंतु अहिल्याबाई होळकरांनी ही विहीर बारव वाटसरुंना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून् बांधलेली दिसते. एक सुचना फळ्यावर विहिरीचा उल्लेख आणि माहिती दिलेली आहे. . विहिरीच्या वरच्या बाजूला झाकण असावे त्या प्रमाणे वरतून् उलट्या टोपलीच्या आकाराचे घुमट आहे. तीन बाजूंना मोकळी अशा स्वरूपाची खिडक्या आहे. विहिरीचा व्यास चाळीस फूट असे लिहिलेले आहे, पण तितकी मोठी वाटत नाही. टोप बावडी असे नामाभिमान तिचे आहे. रस्त्यापासून् डोंगराच्या बाजूने पन्नास फुटाच्या अंतरावर आहे. बांधकाम दगडी सवरूपात केलेले दिसते. जंगलातील प्राणी त्यात पडू नये, पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून् अशी रचना केलेली असावी. परंतु महाराष्ट्रात तरी अशी अद्भूत बांधकामाची विहीर दिसत नाही. स्थानिक या बारवेला अहिल्याबाई बारव टोप बारव टोप बावडी या नावाने ओळखतात.

टोप बावडी-१