तूरक्वाँ
Appearance
(टूरकोइंग या पानावरून पुनर्निर्देशित)
तूरक्वॉं फ्रांसच्या उत्तरेतील एक शहर आहे. २०१२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९२,७०७ होती. बेल्जियमच्या सीमेवर असलेले हे शहर मेत्रोपोल युरोपियें दि लिल या नागरी प्रदेशाचा भाग आहे.
१८ मे, १७९४ रोजी येथे झालेल्या तूरक्वॉंच्या लढाईत फ्रेंच सैन्याने ब्रिटिश आणि ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव केला होता.
येथील गार दे तूरक्वॉं रेल्वे स्थानकातून पॅरिस आणि लिल या शहरांना गतिमान रेल्वेसेवा उपलब्ध आहे.