टाटा सामाजिक विज्ञान संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाटा समाजविज्ञान संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

टाटा सामाजिक विज्ञान संस्था किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही समाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली संस्था आहे. सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने १९३६ मध्ये मुंबई येथे याची स्थापना झाली. १९४४ मध्ये या संस्थेला सध्याचे नाव देण्यात आले.