Jump to content

टर्किश कॉफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टर्किश कॉफी ही तुर्कस्तान देशात मिळणारी एक कॉफी आहे.

प्रास्ताविक

[संपादन]

कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. कॉफी पावडर बनवण्यासाठी कॉफी बिया भाजून त्याची बारीक पूड करतात. कॉफी झाडाच्या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार युरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला. तुर्कस्तान येथील टर्किश कॉफी ही एक वेगळीच मजा देणारी कॉफी आहे.

टर्किश कॉफी

[संपादन]

टर्किश कॉफी ही तुर्कस्तानमध्ये मिळते. ही चवीला कडक असते. ती एका लहानशा कपात दिली जाते. ती एकदम दाट आणि कडक असते. टर्किश कॉफी बरोबर साधारणपणे पाण्याचा पेला, लोकम (टर्किश डिलाइट) वडी दिली जाते. तुर्कस्तान मध्ये कॉफीच्या तळाशी राहिलेल्या कॉफीवरून भविष्य सांगण्याची पद्धत आहे. कॉफी प्याल्यानंतर कप उलट करून ठेवतात. तो थंड झाल्यावर तुमचा मित्र अथवा कँफेचा मालक कपाच्या तळाशी असलेल्या आकृती वरून भविष्य सांगितले जाते.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, रविवार पुरवणी,२४ ऑगस्ट २०२५