Jump to content

झोला बड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झोला बड
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वदक्षिण आफ्रिका, युनायटेड किंग्डम, दक्षिण आफ्रिका संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलादक्षिण आफ्रिका संपादन
दिलेले नावZola संपादन
आडनावBudd संपादन
जन्म तारीख२६ मे 1966 संपादन
जन्मस्थानब्लूमफाँटेन संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायmiddle-distance runner, marathon runner, ultramarathon runner संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाHoërskool Sentraal संपादन
खेळअॅथलेटिक्स संपादन
Sports discipline competed inमॅरॅथॉन संपादन
Participant in१९९२ उन्हाळी ऑलिंपिक, १९८४ उन्हाळी ऑलिंपिक संपादन

झोला बड तथा झोला पीटरसे (२६ मे, १९६६:ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका - ) ही एक दक्षिण आफ्रिकेची मध्यम-अंतराची आणि लांब-अंतराच्या शर्यतींमध्ये भाग घेणारी खेळाडू आहे. तिने १९८४ च्या ऑलिंपिक खेळांमध्ये ग्रेट ब्रिटनचे आणि १९९२ च्या ऑलिंपिक खेळांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने ३००० मीटर शर्यतीत भाग घेतला होता. १९८४ (अनधिकृत) आणि १९८५ मध्ये तिने ५००० मीटर शर्यतीमधील जागतिक विक्रम मोडला. याव्यतिरिक्त ती दोनदा (१९८५-१९८६) जागतिक क्रॉस कंट्री विजेता होती.[][]

बड प्रामुख्याने अनवाणी सराव करायची आणि शर्यतींमध्ये उतरायची. तिचा १९८५ मधील १ मैल धावण्याचा ४:१७.५७ मिनिटांचा ब्रिटिश विक्रम २१ जुलै २०२३ रोजी लॉरा मुइर हिने ४:१५.२४ वेळ नोंदवेपर्यंत३८ वर्षे कायम होता.[]

ती १९८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत परतली आणि तिने १९९२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००८ मध्ये ती आपल्या कुटुंबासह अमेरिकेतील साउथ कॅरोलिना येथे स्थलांतरित झाली आणि तिने तिथे मॅरेथॉन तसेच अल्टरामॅरेथॉन शर्यतींमध्ये भाग घेतला. ती २०२०-२०२१ दरम्यान पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Mackay, Duncan; Meldrum, Andrew (10 August 2005). "Zola Pieterse finds peace in native land". The Guardian. London. २६ मे २०२६ रोजी पाहिले.
  2. "झोला बड: अनवाणी धावणारी ऑलिम्पिकपटू". मराठी माती. २६ मे २०२६ रोजी पाहिले.
  3. "Laura Muir breaks Zola Budd's 38-year-old British mile record" (इंग्रजी भाषेत). BBC Sport. 21 July 2023. २६ मे २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]