Jump to content

झुमूर भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुमूर भट्टाचार्य (जन्म - २७ नोव्हेंबर १९३९, कलकत्ता), श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमधील शिक्षिका, अभिनेत्री व नृत्यांगना.[] संस्कृत, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जर्मन या भाषा झुमूर यांना अवगत आहेत.[]

जीवन व कार्य

[संपादन]

झुमूर यांच्या आईचे नाव मिली-दी. आई आणि वडील दोघेही श्रीअरविंदांचे अनुयायी होते. १९४२ साली झुमूर आपल्या आईसमवेत आश्रमात कायमस्वरूपी वास्तव्यास गेल्या. वडील ब्रिटीश सैन्यामध्ये होते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ते ही आश्रमात वास्तव्यास गेले. सुनील भट्टाचार्य हे झुमूर यांचे काका. ते श्रीअरविंद आश्रमातील संगीतकार आणि वादक होते. झुमूर आणि तारा जौहर, गौरी पिंटो इत्यादी लहान बालीकांसाठी श्रीमाताजींनी काही खेळ शोधून काढले होते. फुलांचे आध्यात्मिक अर्थ त्यातून या मुलींना माहीत झाले. याच मुलींना आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या निमित्ताने श्रीमाताजींनी दर बुधवारी वर्ग घ्यायला सुरुवात केली. श्रीमाताजींच्या सांगण्यावरून झुमूर यांनी श्रीअरविंद लिखित नाट्यउताऱ्यावर आधारित नाटकामध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये झुमूर फ्रेंच आणि इंग्रजी साहित्याचे अध्यापन करत असत. नंतर त्यांनी तेथे श्रीअरविंदांचे सावित्री, लाईफ डिव्हाईन इत्यादी साहित्य शिकविण्यास सुरुवात केली. कालांतराने ते या सेंटरमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करू लागल्या. त्या चाळीस वर्षे अध्यापन करत आहेत.[]

पूरक

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Anie Nunnally (2004). The Golden Path. California: East West Cultural Center, The Sri Aurobindo Center of Los Angeles. ISBN 0-930736-05-2.
  2. ^ "Jhumur Bhattacharya: To Thee Our Infinite Gratitude". AuroMaa.
  3. ^ "Interview with Jhumur Bhattacharya by Anie Nunnally". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-13 रोजी पाहिले.