Jump to content

झुबोनी हुम्त्सो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
জুবনি হামটসো (bn); Zuboni Humtsoe (nl); Zuboni Humtsoe (sq); Zuboni Humtsoe (ast); 주보니 휨초에 (ko); झुबोनी हुम्त्सो (mr); ᱡᱩᱵᱳᱱᱤ ᱦᱩᱢᱛᱥᱳ (sat); ਜ਼ੁਬੋਨੀ ਹਮਤਸੋ (pa); জুবনি হামটছ’ (as); Zuboni Humtsoe (en); జుబోని హమ్త్సో (te); சுபோனி அம்த்சோ (ta) activista india (es); militante indienne (fr); Indian activist (en); indijska aktivistica (hr); aktibista indiarra (eu); ناشطة هندية (ar); Indiaas activiste (1990-2017) (nl); activista índia (ca); Indian activist (en); Indian activist (en-gb); ativista indiana (pt); activista india (gl); Indian activist (en-ca); attivista indiana (it); activista india (ast)
झुबोनी हुम्त्सो 
Indian activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९९०
नागालँड
मृत्यू तारीखनोव्हेंबर १३, इ.स. २०१७
नागरिकत्व
व्यवसाय
  • कार्यकर्ता
नियोक्ता
  • व्यावसायीक व्यक्ती
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झुबोनी हुम्त्सो (१९९० - १३ नोव्हेंबर, २०१७) ही नागालँडमधील एक भारतीय महिला उद्योजक होती. तिने नागालँडमध्ये प्रेशियसमीलव्ह नावाचा एक ऑनलाइन फॅशन आणि हस्तकला विक्रीचा नाममुद्रा (ब्रँड) सुरू केला होता. तिच्या कामाकरीता तिला नारी शक्ती पुरस्कार हा महिलांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी, ह्युमत्सो नागालँडमधील दिमापूर येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. तपासाअंती तिने आत्महत्या केल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा व्यवसाय दिमापूरमध्ये तिची बहीण लोझानो ने चालवण्यास सुरुवात केली.

आयुष्य

[संपादन]

हुम्त्सोचा जन्म १९९०[] साली नागालँडमध्ये झाला. तिने दिल्ली विद्यापीठातून आपले शिक्षण घेतले. तिची एअर होस्टेस बहीण लोझानो हुम्त्सो ने आयात केलेल्या परदेशी फॅशन वस्तू विकण्यास तिने सुरुवात केली. स्वस्तात कपडे खरेदी तर होत होती पण ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होत नव्हती.[]

२०११ मध्ये प्रेशियसमीलव्ह नावाच्या नाममुद्रेची स्थापना नागालँडमधील दिमापूर येथे करण्यात आली होती. ह्यासाठी महाविद्यालयीन अनुदानातून आलेले ३५०० रुपये तिने गुंतवले होते. तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या महत्त्वाकांक्षेमुळे तिला यासाठी बळकटी मिळाली होती.[] या नाममुद्रे (ब्रँड)चे नेतृत्व तिच्या महिला गटातील सर्व महिलानी केले होते.[] प्रेशियसमीलव्ह हा "मेड इन नागालँड" नाममुद्रा बनण्याकडे वाटचाल करत होता.[]

२०१४ मध्ये हॉर्नबिल महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तिची उत्पादने न पाहताच पुढे निघून जाऊ लागले होते. ती त्यांच्या मागे धावत गेली आणि तिचे प्रदर्शन पाहण्यासाठी मोदींना परत घेऊन आली. पंतप्रधानांनी तिच्या प्रदर्शनाला भेट दिल्यापासून "मोदी गर्ल" म्हणून तिची ओळख निर्माण झाली.[]

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

२०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी हुम्त्सो मृत आढळली.[] तपासणी अंती तिने आत्महत्या केल्याचे नक्की झाले.[] हुम्त्सोची, बहीण लोझानो हुम्त्सो आणि नागालँड सरकारच्या महिला संसाधन विकास विभागामुळे हा व्यवसाय पुढे सुरू राहिला. प्रेशियसमीलव्ह (पीएमएल) आणि नुंगशिबा हॅन्डिक्राफ्ट्स असे दोन व्यवसाय सुरू करण्यात आले होते. पीएमएल मध्ये महिलांचे फॅशनेबल कपडे तयार केले जातात. तर शेजारीच असलेले नुंगशिबा हॅन्डिक्राफ्ट्स येथे "नागा डॉल्स" बनवल्या जातात. या बाहुल्या जारी नागालँडमध्ये बनवलल्या जात असल्या तरी त्यामागील प्रेरणा ही जपानी फॅब्रिक बाहुल्यांपासून घेतल्या गेली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "A year after Nagaland entrepreneur's suicide, what lessons have we learnt?". TNT-The NorthEast Today (इंग्रजी भाषेत). 2018-11-14. 2020-04-25 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Made in Nagaland". thevoiceoffashion.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-25 रोजी पाहिले.
  3. ^ "Investment of Rs 3,500 is now a successful first Naga Online Fashion Brand". BookOfAchievers (इंग्रजी भाषेत). 2020-04-25 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "#PreciousMeLove: Zuboni Humtsoe dies at 28". Eastern Mirror (इंग्रजी भाषेत). 2017-11-14. 2020-04-25 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "dies" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ "Nari Shakti Awardees | Ministry of Women & Child Development | GoI". wcd.nic.in. 2020-04-06 रोजी पाहिले.