Jump to content

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Premio Zee Cine a la Mejor Actriz de Reparto (es); ジー・シン・アワード 助演女優賞 (ja); Premi Zee Cine a la Millor actriu de repartiment (ca); झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (mr); Zee Cine Award/Beste Nebendarstellerin (de); زی سائن اعزاز برائے بہترین معاون کردار – اداکارہ (ur); Zee Cine Award for Best Actor in a Supporting Role – Female (en); جائزة زي سيني لأفضل ممثلة في دور ثانوي (ar); κινηματογραφικό Βραβείο Zi Καλύτερου Β' γυναικείου ρόλου (el); শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী বিভাগে জি সিনে পুরস্কার (bn) Hindi film award (en); Hindi film award (en) Premio Zee Cine al Mejor Actor de Reparto - Femenino (es); ジー・シネ・アワード 最優秀助演女優賞, ジー・シネ・アワード 助演女優賞 (ja)
झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री 
Hindi film award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
ह्याचा भागझी सिने पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९९८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा हिंदी चित्रपट उद्योगासाठी झी सिने पुरस्काराचा एक भाग आहे. ह्याच्या विजेत्यांची निवड प्रेक्षकांद्वारे केली जाते आणि प्रत्यक्ष समारंभात विजेत्याची घोषणा केली जाते. "सिनेमातील उत्कृष्टता - लोकशाही मार्गाने" हे ह्या पुरस्काराचे ब्रिदवाक्य आहे.[][][] नोव्हेंबर १९९७ मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. ह्या श्रेणीतील पुरस्कार १९९८ पासून सुरू झाले. हा समारंभ २००९ आणि २०१० मध्ये आयोजित करण्यात आला नव्हता, परंतु २०११ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ आणि २०२२ मध्ये हा सोहळा पुन्हा रद्द करण्यात आला, परंतु २०२३ मध्ये तो पुन्हा सुरू झाला.[]

हा पुरस्कार मार्चमध्ये दिला जातो, परंतु ज्या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळतो तिला मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.

२००४ पर्यंत पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत आयोजित केले जात होते. २००४ नंतर, हा समारंभ दुबई, लंडन, मॉरिशस, मलेशिया, अबू धाबी, सिंगापूर, मकाओ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आयोजित केला गेला आहे. ह्या श्रेणीतील पहिली मानकरी १९९८ मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर होती जिला दिल तो पागल है मधील कामासाठी हा पुरस्कार मिळाला होता.

सुश्मिता सेन (२००० व २००३), दिव्या दत्ता (२००५ व २०१४), स्वरा भास्कर (२०१२ व २०१४) आणि शबाना आझमी (२००४ व २०१७) या चार अभिनेत्री आहेत ज्यांना आजपर्यंत दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे. २०१४ मध्ये दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर यांना त्यांच्या भाग मिल्खा भाग आणि रांझणा या चित्रपटांमधील कामगिरीसाठी विभागून हा पुरस्कार मिळाला होता. माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी आणि अनुष्का शर्मा या तीन अभिनेत्री आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.


विजेते

[संपादन]
वर्ष चित्र अभिनेत्री भूमीका चित्रपट
१९९८
करिश्मा कपूर निशा दिल तो पागल है[]
१९९९
राणी मुखर्जी टिना मल्होत्रा-खन्ना कुछ कुछ होता है
२०००
सुश्मिता सेन रुपाली वालिया बिवी नं. १
२००१
जया बच्चन निशातबी इकरामुल्लाह फिझा
२००२
माधुरी दीक्षित जानकी लज्जा
२००३
सुश्मिता सेन सिया सेठ फिलहाल...
२००४
शबाना आझमी रुकसाना जमाल तेहझीब
२००५
दिव्या दत्ता शबीना "शब्बो" इब्राहिम वीर-झारा
२००६
आयेशा कपूर मिशेल मॅकनॅली ब्लॅक
२००७
कोंकणा सेन शर्मा इंदू त्यागी ओमकारा
२००८
शिल्पा शेट्टी शिखा घोष-कपूर लाइफ इन अ... मेट्रो
२००९ पुरस्कार समारंभ नाही
२०१० पुरस्कार समारंभ नाही
२०११
प्राची देसाई मुमताझ वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
२०१२
स्वरा भास्कर पायल गील तनु वेड्स मनु
२०१३
अनुष्का शर्मा अकिरा राय जब तक है जान
२०१४
दिव्या दत्ता इसरी कौर भाग मिल्खा भाग
स्वरा भास्कर बिंदिया त्रिपाठी रांझणा
२०१५
तबू गजाला मीर हैदर
२०१६
श्वेता त्रिपाठी शालू गुप्ता मसान
२०१७
शबाना आझमी रमा भनोत नीरजा
२०१८
मेहेर विज नजमा मलिक सिक्रेट सुपरस्टार
२०१९
कतरिना कैफ बबिता कुमारी झीरो
२०२०
भूमी पेडणेकर लतिका त्रिवेदी बाला
२०२१ पुरस्कार समारंभ नाही
२०२२ पुरस्कार समारंभ नाही
२०२३
शीबा चड्ढा शोभा गुप्ता डॉक्टर जी[]
२०२४
डिंपल कापडिया डॉ. नंदिनी ग्रेवाल पठाण

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Zee Cine Awards 2017: Get ready to welcome 2018 with Priyanka, Katrina, Shahid, Ranveer". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2017-12-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Rohit Shetty, Sunil Grover to co-host awards show". The New Indian Express. 2017-12-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Zee Cine Awards 2018 | 'Raees' to 'Judwaa 2': Here's the full nomination list!". dna (इंग्रजी भाषेत). 2017-12-08. 2017-12-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Zee launches cine awards". Screen. November 1997. 24 April 2002 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "1st Zee Cine Awards 1998 Popular Award Categories Winners". Zee Television. Zee Entertainment Enterprises. 2 July 1998 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 June 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Zee Cine Awards 2023: Check Full list of Winners, Best Film, Best Actor, Actress, Songs and more". Zeebiz. 18 March 2023 रोजी पाहिले.