Jump to content

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) (mr); Zee Cine Award/Kritikerpreis – Beste Darstellerin (de); Zee Cine Award – Critics' Choice Best Actress (en); Zee Cine Critics Award untuk Pemeran Terbaik – Perempuan (id); جائزة زي سيني لأفضل ممثلة حسب النقاد (ar); শ্রেষ্ঠ অভিনেত্রী বিভাগে জি সিনে সমালোচক পুরস্কার (bn); ジー・シネ・アワード 批評家選考最優秀主演女優賞 (ja) award (en); award (en) Zee Cine Award/Kritikerpreis - Beste Darstellerin (de); ジー・シネ・アワード 最優秀主演女優賞, ジー・シネ・アワード 批評家選出最優秀主演女優賞, ジー・シネ・アワード 審査員選出主演女優賞 (ja)
झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) 
award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी
ह्याचा भागझी सिने पुरस्कार
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) याची निवड झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने आयोजित केलेल्या ज्युरीद्वारे केली जाते. हा हिंदी चित्रपट उद्योगासाठी झी सिने पुरस्काराचा एक भाग आहे.[][][] "सिनेमातील उत्कृष्टता - लोकशाही मार्गाने" हे ह्या पुरस्काराचे ब्रिदवाक्य आहे. नोव्हेंबर १९९७ मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. ह्या श्रेणीतील पुरस्कार २००५ पासून सुरू झाले. हा समारंभ २००९ आणि २०१० मध्ये आयोजित करण्यात आला नव्हता, परंतु २०११ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ आणि २०२२ मध्ये हा सोहळा पुन्हा रद्द करण्यात आला, परंतु २०२३ मध्ये तो पुन्हा सुरू झाला.[]

२००४ पर्यंत पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत आयोजित केले जात होते. २००४ नंतर, हा समारंभ दुबई, लंडन, मॉरिशस, मलेशिया, अबू धाबी, सिंगापूर, मकाओ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आयोजित केला गेला आहे. ह्या श्रेणीतील पहिली मानकरी २००५ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय होती जिला रेनकोट चित्रपटातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला होता. २०२४ पर्यंत हा पुरस्कार १६ वेळा दिला आहे ज्यात १३ अभिनेत्रींना नावाजले आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष चित्र अभिनेत्री भूमीका चित्रपट
२००५
ऐश्वर्या राय निरजा "निरू" रेनकोट
२००६
श्वेता बासु प्रसाद खादिजा इक्बाल
२००७
आयेशा टाकिया मीरा डोर
गुल पनाग झिनत
२००८
शेफाली शाह कस्तुरबा गांधी गांधी, माय फादर
२००९ पुरस्कार समारंभ नाही
२०१० पुरस्कार समारंभ नाही
२०११
ऐश्वर्या राय सोफिया डी'सुजा गुजारिश
२०१२
विद्या बालन रेश्मा / सिल्क द डर्टी पिक्चर
२०१३
विद्या बालन विद्या बागची कहानी
२०१४
सोनाक्षी सिन्हा सौदामिनी चौधरी लूटेरा
२०१५
कतरिना कैफ हरलीन सहानी बॅंग बॅंग!
२०१६
दीपिका पडुकोण पिकू बॅनर्जी पिकू
२०१७
आलिया भट्ट बाउरी / मेरी जेन उडता पंजाब
२०१८
श्रीदेवी देवकी सबरवाल मॉम
२०१९
दीपिका पडुकोण पद्मावती पद्मावत[]
२०२०
तापसी पन्नू नैना सेठी बदला
२०२१ पुरस्कार समारंभ नाही
२०२२ पुरस्कार समारंभ नाही
२०२३
आलिया भट्ट गंगुबाई काठियावाडी गंगूबाई काठियावाडी
२०२४
राणी मुखर्जी देबीका चॅटर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे

अनेक पुरस्कार व इतर माहिती

[संपादन]

चार अभिनेत्रींना हा पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे: ऐश्वर्या राय (२००५ व २०११), विद्या बालन (२०१२ व २०१३), दीपिका पडुकोण (२०१६ व २०१९), आणि आलिया भट्ट (२०१७ व २०२३). ह्यात विद्या बालन यांना द डर्टी पिक्चर आणि कहानी ह्या चित्रपटांमधील कामगिरीसाठी हा पुरस्कार लागोपाठ मिळाला आहे. २००७ मध्ये आयेशा टाकिया आणि गुल पनाग या दोघींना डोर चित्रपटासाठी हा पुरस्कार विभागून मिळाला.

ह्या विजेत्यांपैकी, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, दीपिका पडुकोण, राणी मुखर्जी आणि विद्या बालन या पाच अभिनेत्रींना झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देखिल मिळाला आहे. ह्यात बालन यांना दोन्ही पुरस्कार एकाच चित्रपटासाठी (द डर्टी पिक्चर) मिळाले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Zee Cine Awards 2017: Get ready to welcome 2018 with Priyanka, Katrina, Shahid, Ranveer". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2017-12-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Rohit Shetty, Sunil Grover to co-host awards show". The New Indian Express. 2017-12-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Zee Cine Awards 2018 | 'Raees' to 'Judwaa 2': Here's the full nomination list!". dna (इंग्रजी भाषेत). 2017-12-08. 2017-12-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Zee launches cine awards". Screen. November 1997. 24 April 2002 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Zee Cine Awards, 2019". insider.in (इंग्रजी भाषेत). Wasteland Entertainment Pvt Ltd. 26 April 2019 रोजी पाहिले.