ज्वालामुखीय राख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्वालामुखीच्या राखेमध्ये चकचकीत खडक, खनिजे आणि ज्वालामुखीय काच आदींचा समावेश होतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही राख तयार होते. राखेतील या तुकड्यांचा व्यास बहुधा २ मिमी (०.०७९ इंच) पेक्षा कमी असला तरी ज्वालामुखीय राख हा शब्द २ मिमीपेक्षा मोठ्या कणांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या विस्फोटक उद्रेक उत्पादनांसाठीही वापरला जातो. जेव्हा मेग्मातील वायू ज्वालामुखीतून बाहृ पडून वातावरणात मिसळतात, त्यावेळी वायूच्या दबावामुळे मेग्मा हवेत विखुरला जातो आणि ज्वालामुखीच्या खडकांच्या आणि काचांच्या तुकड्यांच्या रूपात तो खाली येतो. एकदा हवेमध्ये मिसळली की मग ही राख वाऱ्याबरोबर हजारो किलोमीटर दूर वाहून जाते.

ह्या राखेच्या पसरण्यामुळे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शिवाय विमान सेवा, तसेच पायाभूत सुविधा (उदा. विजेच्या तारा , दूरसंचार, पाणी आणि वाहतूक), प्राथमिक उद्योग (उदा. शेती), इमारती आणि संरचना. यांच्यावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो.