ज्योती कपिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्योती कपिले या एक कवयित्री, बालसाहित्यिक, अनुवादक आणि जे. के. मीडियाच्या प्रकाशक आहेत. तसेच त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेच्या सन २०१५-१८ च्या कार्याध्यक्ष आहेत. कपिले ह्या विविध कार्यक्रमांतून सूत्र संचालन, निवेदने करतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या अध्यक्ष असतात, किंवा प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा सहभाग असतो. ज्योती कपिले यांचे लिखाण, कथा, त्यांची परीक्षणे, चारोळ्या, कविता, ललित लेख, सिनेकलावंतांच्या मुलाखती आदी लिखाण विविध वृत्तपत्रांतून, मासिकांतून व दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होत असते.

ज्योती कपिले यांनी भूषविलेली पदे व अंगीकारलेली कामे[संपादन]

 • प्रसिद्धी प्रमुख, कोकण मराठी साहित्य परिषद. मुंबई जिल्हा मंडळ २०१५-१८
 • अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, वांद्रे शाखा २०१२-१५
 • सहकार्यवाह, कोकण मराठी साहित्य परिषद. मुंबई शाखा २०१२-१५
 • उपसंपादक :- लीलाई दिवाळी वार्षिक २००५ ते २०११. चेरीलॅंड - लहान मुलांचे मासिक २०१२
 • द ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रासाठी बाल कट्टा या पुरवणीचे संयोजन २०१२ ते १३
 • दैनिक लोकसत्तामधील सदर लेखन : गंमत कोडी
 • दैनिक प्रवाहमधील सदर लेखन : बालकथा
 • शरद जोशी,आणि डॉ. सूर्यबाला यांच्या हिंदी कथांचा मराठी अनुवाद
 • मुंबई आकाशवाणीसाठी कथावाचन, काव्यसंमेलन, 'गंमत जंमत' कार्यक्रमासाठी लेखन.
 • आर्चिज, सनकार्ड, ज्वेलरी शॉप्स आदींसाठी लेखन.

ज्योती कपिले यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

 • कोडी झाली नाटुकली
 • गंमत कोडी - बालकविता संग्रह - दुसरी आवृत्ती
 • 'ते' आंब्याचे दिवस (बालसाहित्य)
 • पैचाम कोण (बालसाहित्य)
 • प्रिय सखी – कवितासंग्रह
 • मनमुक्ता - कवितासंग्रह
 • रागोबानी वाघोबा - बालकविता संग्रह
 • सांगा लवकर सांगा - बालकविता संग्रह - दुसरी आवृत्ती
 • सूर्यबाला आणि शरद जोशी यांच्या कथा (कथासंग्रह)

ज्योती कपिले यांच्या पुस्तकास मिळालेले पुरस्कार[संपादन]

 • अकोल्याव्या अंकुर साहित्य संघाचा 'बालकवी 'पुरस्कार, २००९.
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्र.श्री.नेरुरकर उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार, २०१०
 • 'गंमत कोडी'ला पुरस्कार
 • मुंबईच्या साहित्य दरवळ मंचाचा २००९ सालचा उकृष्ट बालसाहित्य पुरस्कार.
 • 'सांगा लवकर सांगा'ला मुंबईच्या साहित्य दरवळ मंचाचा २०११ सालचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
 • 'रागोबानी वाघोबा'ला कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्र. श्री.नेरुरकर उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार २०१३.
 • काही वाङ्मयेतर पुरस्कार