Jump to content

ज्योतिका टांगरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jyotica Tangri (es); ജ്യോതിക ടാങ്ഗ്രി (ml); Jyotica Tangri (nl); Jyotica Tangri (en); ज्योतिका तंगरी (hi); జ్యోతికా తంగ్రి (te); ਜਯੋਤਿਕਾ ਟਾਂਗਰੀ (pa); Jyotica Tangri (sq); জ্যোতিকা টাংগ্ৰী (as); Jyotica Tangri (ast); ज्योतिका टांगरी (mr) playback Singer (en); playback Singer (en); zanger (nl); ভাৰতীয় নেপথ্য কণ্ঠশিল্পী (as); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag)
ज्योतिका टांगरी 
playback Singer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१७
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ज्योतिका टांगरी ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. ती शादी में जरूर आना (२०१७) या हिंदी चित्रपटामधील "पल्लो लटके", टोटल धमाल (२०१९) मधील "मुंगडा" आणि बाजरे दा सिट्टा (२०२२) मधील "सुरमेदानी" या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. बहन होगी तेरी (२०१७) मधून तिने "जय माँ" मधून पार्श्वगायनात पदार्पण केले. तिने हाफ गर्लफ्रेंड (२०१७), शादी में जरूर आना (२०१७), आणि फुक्रे रिटर्न्स (२०१७) यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. २०१८ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा झी सिने पुरस्कार मिळाला. तिला पंजाबी संगीत उद्योगातील "कांडा कचेया", "जिने साह", आणि "सारी रात" सारख्या गाण्यांसाठी देखील ओळखले जाते.

करिअर

[संपादन]

टांगरी भारतीय रिॲलिटी टेलिव्हिजन शो द व्हॉइस मध्ये स्पर्धक होती.[] २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत तिला स्थान मिळाले नाही. ती झी टीव्हीवरील सा रे गा मा पा २०१६ ची फायनलिस्ट देखील होती.

तिने २०१७ मध्ये अजय के पन्नालाल यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट, बहेन होगी तेरी मध्ये साहिल सोलंकी यांनी सह-गायलेल्या, "जय मा" या गाण्याद्वारे पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले.[][] हे गाणे जयदेव कुमार यांनी संगीतबद्ध केले होते आणि सोनू सग्गु यांनी गीतलेखन केले होते. त्याच चित्रपटातील तिचे दुसरे गाणे, " तेनु ना बोल पावां मैं", हे यासर देसाई सोबत गायले जे समीक्षकांनी खूप प्रशंसित केले.[][] अमजद नदीम यांनी संगीतबद्ध केलेले आणि रोहित शर्मा यांनी लिहिलेले हे गाणे अल्बममधील काही हिट गाण्यांपैकी एक होते. पुढे, टांगरीने मोहित सुरीच्या हाफ गर्लफ्रेंडमधून "फिर भी तुमको चाहूंगा" गाण्याची खास आवृत्ती गायली.[] मिथून यांनी संगीतबद्ध केलेले, मूळ अरिजीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांनी गायलेले आणि मनोज मुंतशीर यांनी लिहिलेले, या गाण्याने टांगरीला चित्रपटसृष्टीत संगीताचा पाया स्थापित करण्यास मदत केली. तिने त्याच चित्रपटातील "तू ही है" या गाण्याचे महिला आवृत्ती देखील गायले, जे मूळ राहुल मिश्रा यांनी गायले होते.

टांगरीचे पहिले हिट गाणे विनोद बच्चन यांच्या शादी में जरूर आना या चित्रपटातील कुमारने लिहीलेले "पल्लो लटके" हे होते, ज्यात राजकुमार राव आणि क्रिती खरबंदा होते व झैम-सैम-रईस यांनी संगीतबद्ध केले होते.[] त्या वर्षीच्या शेवटी, टांगरीने फुकरे रिटर्न्समधील "इश्क दे फन्नियार" गाण्याचे महिला आवृत्ती गायले.[] 2018 मध्ये, ज्योतिकाने परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण मधील "शुभ दिन" गायले. सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायु यांनी लिहिलेले हे गाणे समीक्षकांनी प्रशंसित केले होते.[]

२०२० मध्ये, चिरंतन भट्ट, रामजी गुलाटी आणि अमजद नदीम आमिर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली टांगरीने उर्वशी रौतेला अभिनीत व्हर्जिन भानुप्रिया या चित्रपटासाठी तीन गाणी गायली.

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार गाणे चित्रपट निकाल
२०१८ सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी झी सिने पुरस्कार "पल्लो लटके" शादी में जरूर आना विजयी[१०]
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी स्क्रीन पुरस्कार नामांकन[११]

संदर्भ

[संपादन]
  1. "Singer Jyotica Tangri: Bollywood music is the perfect portrayal of all emotions". indianexpress.com. 5 February 2018. 30 May 2018 रोजी पाहिले.
  2. Zee Music Company (29 March 2017). "Jai Maa - Behen Hogi Teri - Rajkummar Rao & Shruti Haasan - Sahil Solanki & Jyotica Tangri". 17 June 2018 रोजी पाहिले YouTube द्वारे.
  3. "'Jai Maa' from the movie 'Behen Hogi Teri' is a rehash version of 'Kala Chashma' - Free Press Journal". freepressjournal.in. 30 March 2017. 17 June 2018 रोजी पाहिले.
  4. Zee Music Company (31 May 2017). "Tenu Na Bol Pawaan - Behen Hogi Teri - Shruti Haasan & Raj Kummar Rao - Yasser Desai - Amjad Nadeem". 17 June 2018 रोजी पाहिले YouTube द्वारे.
  5. "I recorded 'Bahon Mein Chale Aao' in one go: Jyotica Tangri". radioandmusic.com. 17 June 2018 रोजी पाहिले.
  6. "मैं फिर भी तुमको चाहूंगी... मखमली आवाज में सुने ज्योतिका गाया ये गाना". patrika.com. 17 October 2015. 17 June 2018 रोजी पाहिले.
  7. "I have to do more good work: Jyotica Tangri on winning an award". radioandmusic.com. 17 June 2018 रोजी पाहिले.
  8. "Singer Jyotica Tangri: Bollywood music is the perfect portrayal of all emotions". indianexpress.com. 5 February 2018. 17 June 2018 रोजी पाहिले.
  9. "Parmanu's first song Shubh Din celebrates India's 1998 nuclear achievement. Watch video". indiatvnews.com. 14 May 2018. 17 June 2018 रोजी पाहिले. { Her latest song is 'Ek chumma' from the movie Housefull4.
  10. "63rd Jio Filmfare Awards 2018: Official list of nominations - टाइम्स ऑफ इंडिया". timesofindia.com. 30 May 2018 रोजी पाहिले.
  11. "Star Screen Awards 2017: Dangal wins big, Vidya Balan-Rajkummar Rao named best actor and actress". 2017-12-31 रोजी पाहिले.