ज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह )

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

"ज्ञानभाषा मराठी" हा एक सोशल मीडिया (समाज माध्यमा)वर कार्यरत असणारा समूह आहे. या समूहातर्फे मराठी भाषा संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जातात. डोंबिवली येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात भाग घेऊन या समूहातील कार्यकर्त्यांनी लोकांना मराठी भाषा वापरण्यासाठी प्रेरित केले. मराठी शाळा वाढाव्यात, मराठीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणूनदेखील या समूहातर्फे खूप प्रयत्न केले जातात. आता ज्ञानभाषा मराठी हा केवळ समाजमाध्यमांवरील समूह न राहता, त्याचे रुपांतर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेत झालेले आहे.

स्थापना[संपादन]

प्रमुख प्रशासक[संपादन]

या समूहाचे प्रशासक म्हणून सुचिकांत वनारसे, अजित तिजोरे, शंकर पाटील, धनंजय येलगट्टे, सोजर मस्के, मृणाल पाटोळे कार्यरत आहेत.

कार्य[संपादन]

मराठी भाषेतील अनेक लहानसहान गोष्टी,हमखास लिहिताना,बोलताना होणाऱ्या चुकांचे मार्गदर्शन,शब्द उत्पत्ती,मराठी शाळांसाठी अजून काय करता येईल यावर चर्चा,माहितीची देवाणघेवाण.

विविध भावपूर्ण कवींच्या कविता, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली भूगोल, इतिहास, विज्ञान, गणितीय संकल्पना आणि विविध विषयांवरील संकलने प्रसारित केली जातात. मातृभाषेतील शिक्षणावर आधारित शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ज्ञानभाषा मराठी समुहातर्फे presentation तयार करून ती हजारो लोकांपर्यंत इमेल द्वारा पोहोचवली गेली आहे.

बोलक्या पोस्ट (ऑनलाईन वाचनकट्टा) हा अभिनव उपक्रम या समूहातर्फे राबविला जातो!!

वेळेअभावी आपल्या हातून अनेक चांगले लेख वाचायचे राहून जातात, अगदी WHATSAPP च्या पोस्ट्स देखील खूप मोठ्या आहेत म्हणून आपण त्या वाचायचे टाळतो. हा मुद्दा लक्षात घेऊन ऑनलाइन वाचनकट्टा ही संकल्पना रुजवण्यात आली. हल्लीच्या पिढीचे ऑनलाईन वाचन आता स्टाईलीश वाचन झाले आहे. हे लक्षात घेता लोकांना याच पोस्ट वाचण्याऐवजी ऐकायल्या मिळाल्या तर त्यांचा वेळही वाचेल आणि ज्ञानात भरही पडेल, अशी कल्पना पुढे आली.

प्रत्येकी ५-६  जणांचे एक ग्रूप बनूवन प्रत्येक रविवारी त्या-त्या ग्रूपने आपल्याला आवडलेल्या एखाद्या लेखाचे किंवा पोस्टचे रेकॉर्डींग करून ती ग्रूपवर पोस्ट करण्यास सुरवात झाली. सुरवातीला ८-१० सदस्यांवर सुरू झालेली ही चळवळ आता तब्बल 20 ते 25 सदस्य आणि *माझी शाळा माझी भाषा* या १४ व्हॉट्सॲप समुहातील महाराष्ट्र भरातील शिक्षक आणि विद्यार्थी माध्यमातून या वाचनपुढे सरकत आहे.

बाह्य दुवा[संपादन]

[१]