Jump to content

जो सॅंतियागो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जो सॅंतियागो
सॅंतियागो स्टॉकहोम, स्वीडनमधील कार्यक्रमात, जून इ.स. २००९
पार्श्वभूमी ची माहिती
जन्मनाम जोसेफ अल्बर्ट सॅंतियागो
जन्म १० जून, १९६५ (1965-06-10) (वय: ५९)
मनिला, फिलिपाईन्स
शैली अल्टरनेटिव्ह रॉक (इंग्लिश: Alternative rock)
व्यवसाय संगीतकार
वाद्ययंत्र गिटार, बास, किबोर्ड व गायन
सक्रिय वर्ष १९८६–सद्य
रिकॉर्ड लेबल ४ ए.डी. (इंग्लिश: 4AD)
संबंधित प्रदर्शन पिक्सीज, द मार्टिनीज
प्रसिद्ध वाद्ययंत्र
गिब्सन लेस पॉल (गिटारचा एक प्रकार)

जोसेफ अल्बर्टो "जो" सॅंतियागो (इंग्लिश: Joey Santiago) (जून १०, इ.स. १९६५ - हयात) हा फिलिपीनी-अमेरिकन गिटार वादक व संगीतकार आहे. तो इ.स. १९८६ पासून कार्यरत आहे. अमेरिकन अल्टरनेटिव्ह रॉक बॅंड पिक्सीजचा प्रमुख-गिटारवादक म्हणून तो प्रसिद्ध आहे. तो गट इ.स. १९९३ मध्ये फुटल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांना व दूरचित्रवाणी माहितीपटांना संगीत दिले. नंतर त्याने त्याची पत्नी लिंडा मल्लारीसोबत द मार्टिनीज नावाचा गट स्थापन केला. त्याने चार्ल्स डग्लसफ्रॅंक ब्लॅक यांच्या ध्वनिमुद्रिकांमध्येसुद्धा गिटारवादन केले आहे. पिक्सीज गट इ.स. २००४ साली परत जमला, तेव्हा सॅंतियागो प्रमुख-गिटारवादक म्हणून रुजू झाला.