जोसेफ स्मिथ, जुनियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोसेफ स्मिथ, जुनियर (२३ डिसेंबर, १८०५:शॅरन, व्हरमाँट, अमेरिका - २७ जून, १८४४:कार्थेज, इलिनॉय, अमेरिका) हे ख्रिश्चन धर्माच्या मॉर्मन पंथाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी बूक ऑफ मॉर्मन हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे.