जोसेफ स्टिलवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनरल जोसेफ वॉरेन स्टिलवेल (१९ मार्च, इ.स. १८८३:पलाट्का, फ्लोरिडा, अमेरिका - १२ ऑक्टोबर, इ.स. १९४६:सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन सैन्याधिकारी होता. याने दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारत, म्यानमार आणि चीनमध्ये जपानी सैन्यासमोर दोस्त सैन्याचे नेतृत्व केले.

आपल्या खत्रूड स्वभावामुळे स्टिलवेलला व्हिनेगार ज्यो असे टोपणनाव होते.

भारतातील लेडो आणि चीनमधील कुनमिंग शहरांना जोडणाऱ्या लेडो मार्गाला च्यांग कै शेकने स्टिलवेलच्या स्मरणार्थ स्टिलवेल रोड असे नाव दिले.