जोश (२००० चित्रपट)
2000 film by Mansoor Khan | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार | |||||
| पटकथा | |||||
| निर्माता |
| ||||
| दिग्दर्शक | |||||
| प्रमुख कलाकार |
| ||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| कालावधी |
| ||||
| |||||
जोश हा २००० सालचा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे जो मन्सूर खान दिग्दर्शित आहे, व्हीनस फिल्म्स निर्मित आहे आणि बी४यू फिल्म्स द्वारे वितरित केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, चंद्रचूड सिंग, शरद कपूर आणि प्रिया गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट, प्रामुख्याने हिंदीमध्ये आणि कधीकधी कोंकणी भाषेत आहे, आणि कथानक गोव्यात घडते आणि चित्रीकरण पण गोव्यात झाले आहे.[१] १९६१ च्या संगीतमय अमेरिकन चित्रपट वेस्ट साइड स्टोरीपासून प्रेरित काही कथानकाचे भाग आहे.[२] हा चित्रपट १९८० मध्ये गोव्यातील रिअल इस्टेट व्यवहार आणि सांप्रदायिक हिंसाचाराची पार्श्वभूमी दाखवतो.[३]
जोश हा चित्रपट ९ जून २००० रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर मध्यम प्रमाणात यशस्वी झाला. त्याने जगभरात
३५.०६ कोटी (US$७.७८ दशलक्ष) कमावले. समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिसाद मिळाला; संगीत, छायांकन, अॅक्शन सीक्वेन्स आणि कलाकारांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली, परंतु त्याच्या पटकथेवर टीका झाली. ४६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह पाच नामांकने मिळाली होती.[४]
गीत
[संपादन]सुरुवातीला ए.आर. रहमान यांना संगीतकार म्हणून साइन करण्यात आले होते, परंतु इतर चित्रपटांशी वेळापत्रकातील संघर्षांमुळे त्यांनी निवड रद्द केली.[५] रहमानने चित्रपट सोडल्यानंतर, मन्सूर खानने संगीत लवकर पूर्ण करण्यासाठी आणि वेळेवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अनू मलिकची मदत घेतली. "हाए मेरा दिल" हे गाणे पीटर उडेल आणि गॅरी गेल्ड यांनी लिहिलेल्या " सील्ड विथ अ किस " आणि जिप्सी किंग्ज यांनी सादर केलेल्या "जोबी जोबा" गाण्यावर आधारित आहे.[६] एका उल्लेखनीय पदार्पणात, शाहरुख खानने "अपुन बोला" हे गाणे गाऊन आपली गायकीची प्रतिभा दाखवली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, सुमारे १८,००,००० युनिट्स विकल्या गेल्याने, या चित्रपटाचा साउंडट्रॅक वर्षातील नववा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम होता.[७]
| # | गीत | गायक | लांबी | गीतकार |
|---|---|---|---|---|
| १ | "अपुन बोला" | हेमा सरदेसाई आणि शाहरुख खान | ०४:२५ | नितीन रायकवार |
| २ | "हाए मेरा दिल" | उदित नारायण आणि अलका याज्ञिक | ०४:०८ | समीर अंजान |
| ३ | "हम तो दिल से हारे" | उदित नारायण आणि अलका याज्ञिक | ०५:०६ | समीर अंजान |
| ४ | "मेरे खयालों की मलिका" | अभिजीत भट्टाचार्य | ०४:५० | समीर अंजान |
| ५ | "जिंदा हैं हम तो" | अभिजीत भट्टाचार्य, जॉली मुखर्जी आणि हेमा सरदेसाई | ०४:४४ | नितीन रायकवार |
| ६ | "सैलारू सैलारे" | मानो आणि सुरेश पीटर्स | ०५:२५ | समीर अंजान |
| ७ | "हाए मेरा दिल" | (वाद्य) | ०४:०८ | - |
| ८ | "हम तो दिल से हरे" | (वाद्य) | ०५:०७ | - |
पुरस्कार
[संपादन]- ४६ वे फिल्मफेर पुरस्कार
नामांकन
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - रतन जैन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मन्सूर खान
- सर्वोत्कृष्ट खलनायक - शरद कपूर
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनु मलिक
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - अलका याज्ञिक "हाए मेरा दिल"
- दुसरा आयफा पुरस्कार
जिंकले
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – नितीन चंद्रकांत देसाई
नामांकन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मन्सूर खान
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - चंद्रचूड सिंग
- सर्वोत्कृष्ट खलनायक - शरद कपूर
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनू मलिक
- सर्वोत्कृष्ट कथा - मन्सूर खान
संदर्भ
[संपादन]- ↑ "Josh". Sify. 3 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "SRK- Aish's 'Josh' clocks 16 yrs today". 9 June 2016. 13 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 October 2020 रोजी पाहिले – Business Standard द्वारे.
- ↑ "The Sunday Tribune - Spectrum - Article". www.tribuneindia.com. 8 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 October 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Awards (1953–2005)" (PDF). 12 June 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 5 November 2007 रोजी पाहिले.
- ↑ "The Complete Biography of A.R.Rahman - The A.R.Rahman Page". gopalhome.tripod.com. 15 June 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 August 2012 रोजी पाहिले.
- ↑ Srinivasan, Karthik (27 November 2018). "Anu Malik's Unusual Mix Of A 1960s And A 1980s Song For Mansoor Khan's Josh". Film Companion. 27 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 November 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Music Hits (2000-2009)". 2010-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-27 रोजी पाहिले.