जॉन फिलिप सूसा
Appearance
जॉन फिलिप सूसा (६ नोव्हेंबर, १८५४ – ६ मार्च, १९३२) हा एक अमेरिकन संगीतकार होता. याने रचलेल्या कूचगीतांचे संगीत जगप्रसिद्ध आहे. यात "द स्टार्स अँड स्ट्राइप्स फॉरएव्हर " ( युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे राष्ट्रीय कूचगीत), सेम्पर फिडेलिस ( युनायटेड स्टेट्स मरीन कॉरचे अधिकृत कूचगीत), द लिबर्टी बेल आणि द वॉशिंग्टन पोस्ट यांचा समावेश आहे.