जगदीश स्वामीनाथन सामान्यतः जे.स्वामिनाथन म्हणून ओळखले जातात (२१ जून १९२८ - १९९४) हे एक आघाडीचे भारतीय कलाकार, चित्रकार, कवी आणि लेखक होते. [१] ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. १९८२ मध्ये भोपाळ मध्ये "भारत भवन" या कला दालनाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यातील रूपंकर कला संग्रहालयाचे संचालक म्हणून त्यांनी १९९० पर्यंत काम केले. १९९१-९२ मध्ये त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.