Jump to content

जेस्सी जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेस्सी जॅक्सन हे मार्टिन ल्यूथर किंग यांचे नागरी हक्क चळवळीतील एक सहयोगी होते.

जीवन व कारकीर्द

[संपादन]

जेस्सी यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९४१ रोजी ग्रीनव्हिल, साऊथ कॅरोलायना येथे झाला होता. ते शिकागो येथे नागरिक हक्क चळवळीत कार्यरत होते. ते शिकागो येथे असताना मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या होण्यापूर्वी त्यांना मेम्फिस मधील लॉरेन हॉटेलमध्ये किंग यांच्या भेटीसाठी बोलावले होते. किंग यांच्या निधनानंतर जेस्सी हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून समोर आले. त्यांनी संपूर्ण आयुष्य अमेरिका व परदेशात नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी मतदानाचे अधिकार, नोकरीच्या संधी, शिक्षण, आरोग्य सेवा या क्षेत्रात गरीब व वंचित लोकांसाठी कार्य केले. समाजात समानता व खुले वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अधिकाऱ्यांना भाग पाडले.

मी कोणीतरी आहे अशी कविता लिहून त्यांनी सर्व वर्णांच्या लोकांपर्यंत आपला लढा आणि विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कवितेतील काही कडवी खालीलप्रमाणे आहेत. मी गरीब असू शकतो पण मी कोणीतरी आहे. मी तरुण असू शकतो पण मी कोणीतरी आहे. मी कल्याणकारी योजनेचा लाभार्थी असू शकतो पण मी कोणीतरी आहे

जॅक्सन यांनी मार्टिन ल्युथर किंग नंतर अनेक दशके नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व केले.शेवटच्या टप्प्यात त्यांना मेंदूच्या दुर्मिळ विकारामुळे बोलणे व चालणे कठीण झाले होते. तरीसुद्धा ते आपल्या ध्येयापासून हटले नाहीत आणि वांशिक अन्याय,व भेदभावाविरुद्ध लढत राहिले.

निधन

[संपादन]

मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांच्या कन्या संतिता यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की

आमचे वडील फक्त आमच्या कुटुंबासाठी नव्हे तर जगभरातील पीडित, आवाजहीन, दुर्लक्षित लोकांचे नेते होते. ते जगासाठी जगले आणि त्या बदल्यात जग आमच्या विस्तारित कुटुंबाचा भाग बनले. न्याय, समानता, आणि प्रेम यावर त्यांचा अढळ विश्वास होता. त्यामुळे लाखो लोकांची प्रगती झाली. ते ज्या मुल्यांसाठी जगले त्यासाठीचा लढा असा अविरत चालू ठेवून त्यांची स्मृती जिवंत ठेवावी.

[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]

साचा:संदर्भ सूची

  1. महाराष्ट्र टाईम्स, बुधवार,१८ फेब्रुवारी २०२६