Jump to content

जेम्स वॉट्सन (जीवशास्त्रज्ञ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स डी.वॉटसन हे एक नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ होते.

जेम्स डी. वॉटसन
पूर्ण नावजेम्स डी. वॉटसन
जन्म ६ एप्रिल, १९२८ (1928-04-06)
शिकागो
मृत्यू ८ नोव्हेंबर, २०२५ (वय ९७)
अमेरिका
निवासस्थान अमेरिका [[]]
नागरिकत्व अमेरिका [[]]
राष्ट्रीयत्व अमेरिकन [[]]
वांशिकत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र वैद्यक शास्त्र
कार्यसंस्था  •  इंडियाना विद्यापीठ
 •  [[]]
[[]]
प्रशिक्षण  •  इंडियाना विद्यापीठ
 •  [[]]
डॉक्टरेटचे मार्गदर्शक साल्वडोर लुरिया
डॉक्टरेटकरता विद्यार्थी मेरीओ कपेची.२होवार्ड हॉर्विट्झ
ख्याती डीएनए शोध
पुरस्कार नोबेल
वडील डी.वॉटसन
पत्नी [[ ]]

जीवन व कारकीर्द

[संपादन]
  1. जेम्स वॉटसन यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे ६ एप्रिल १९२८ रोजी झाला.
  2. त्यांनी इंडियाना विद्यापीठ येथे प्राणीशास्त्रात डॉक्टरेट केली.तेव्हा त्यांना पक्षीतज्ज्ञ व्हायचे होते.
  3. त्यांच्या वाचनात एर्विन श्राडिंगर यांचे व्हाट इज लाइफ? हे पुस्तक आले आणि त्यांच्या संशोधनाची दिशा बदलली आणि त्यांनी जेनेटिक्स विषयावर काम करायचे ठरवले.
  4. डॉक्टरेट मिळाल्यानंतर ते केंब्रिजला गेले.
  5. इसवी सन १९५५ मध्ये वॉटसन हार्वर्ड विद्यापीठ येथे काम करू लागले. इसवी सन १९६१ मध्ये ते प्राध्यापक झाले. इसवी सन १९६८ मध्ये ते न्युयार्क च्या कोल्ड स्प्रिंग हार्बर लँबोरेटरीचे संचालक झाले. जवळजवळ ३९ वर्षे वॉटसन हे त्या संस्थेत डायरेक्टर, प्रेसिडेंट, चान्सलर, चान्सलर इमरिटरस अश्या विविध पदांवर कार्यरत होते.
  6. वॉटसन यांनी साल्वडॉर लुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली. लुरिया हे नोबेल पारितोषिक विजेते होते.वॉटसन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केलेले मेरीओ कपेचीहोवार्ड हॉर्विट्झ हे नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांच्याकडे पोस्टडॉक केलेले फिलिप शार्परिचर्ड रॉबर्टस हे नोबेल पारितोषिक विजेते होते.[]
  7. कँव्हेंडिश लँब मध्ये जेम्स वॉटसन यांची फ्रांसिस क्रिक यांच्याशी भेट झाली.
  8. जेम्स वॉटसन आणि फ्रांसिस क्रिक यांनी डीएनए ची डबल हेलिक्स त्रिमितीय रचना सर्वप्रथम निश्चित केली. इसवी सन १९६२ मध्ये त्या दोघांना वरील कामगिरीसाठी वैद्यक शास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.फ्रांसिस क्रिक हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ होते.
  9. जेम्स वॉटसन यांना अवघ्या पंचविसाव्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले होते.
  10. जेनेटिक इंजिनिअरिंग थेरपी, डीएनए आधारित औषधे व तंत्रज्ञान त्यामुळे विकसित करता आले.
  11. जेम्स वॉटसन यांनी इसवी सन १९६८ मध्ये आत्मचरित्र लिहिले.
  12. त्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे ते वादग्रस्त विद्वान म्हणून परिचित झाले.त्यावेळी त्यांना न्युयार्क येथील कोल्ड स्प्रिंग हार्बर लँबोरेटरी च्या कुलगुरू पदावरून हटविण्यात आले.
  13. जीनोम चे ज्ञान सार्वजनिक क्षेत्रातच राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून त्यांनी इसवी सन १९९० मध्ये त्यांच्याकडे सोपविलेल्या महत्वाकांक्षी जीनोम प्रकल्पाचे नेतृत्व करताना राष्ट्रीय आरोग्य संस्थेने पेटंट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजीनामा दिला.
  14. त्यांनी स्वतःकडे असलेली सर्व जीनोम माहिती उघड केली.
  15. इसवी सन २००७ साली वॉटसन यांनी स्वतःच्या डीएनएचे सिक्वेन्सिंग करून घेतले व इंटरनेटवर सर्वांसाठी खुले केले होते.
  16. इसवी सन २०१४ मध्ये आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांना स्वतःचे नोबेल पारितोषिक लिलावात विकावे लागले होते.[]
  17. हे नोबेल पदक आणि सायटेशन रशियन अब्जाधीश उद्योगपतीने ४६ लाख डॉलर्सना विकत घेतले होते आणि जेम्स वॉटसनना पुन्हा सन्मानाने परत केले होते.जेम्स वॉटसन यांनी लिलावातील काही रक्कम कोल्ड स्प्रिंग हार्बर लँबोरेटरीला दान केली होती.
  18. वॉटसन यांच्या वर्णद्वेषी विधानांमुळे इसवी सन २००७ साली त्यांना कोल्ड स्प्रिंग हार्बर लबोरेटरीच्या चान्सलर एमरिटस या पदावरून पायउतार व्हावे लागले. इसवी सन २०१९ मध्ये पुन्हा एका डॉक्युमेंटरी मध्ये केलेल्या वर्णद्वेषी विधानांनंतर कोल्ड स्प्रिंग हार्बर लँबोरेटरीने त्यांना दिलेल्या सर्व मानद पदव्या काढून घेतल्या.

[]

पुरस्कार

[संपादन]

वॉटसन यांना इसवी सन १९६२ साली नोबेल पुरस्कार मिळाला.

ग्रंथसंपदा

[संपादन]

वॉटसन हे हाडाचे शिक्षक होते. त्यांनी खालील पुस्तके लिहिली:-

  1. मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ दि जीन इ.स.१९६५.
  2. दि डबल हेलिक्स इ.स.१९६८.
  3. डीएनए दि स्टोरी ऑफ जेनेटिक रिव्होल्युशन इ.स.२०१७.

मृत्यू

[संपादन]

शनिवार दिनांंक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१३ नोव्हेंबर २०२५
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार,११ नोव्हेंबर २०२५
  3. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१३ नोव्हेंबर २०२५
  4. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,१०नोव्हेंबर २०२५