जेम्स लव्हलॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेम्स लव्हलॉक

जेम्स लव्हलॉक (जन्म: २६ जुलै १९१९) हे पर्यावरण वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.[१]

जन्म व बालपण[संपादन]

जेम्स लव्हलॉक यांचा इंग्लंडमधील एका खेड्यात अत्यंत गरीब घरात जन्म झाला. त्यांची आई लोणच्याच्या कारखान्यात कामाला होती व वडील शिकारी होते. जेम्स लव्हलॉक सांगतात, त्यांचे वडील निरक्षर असूनही त्यांना निसर्ग, पशुपक्षी, वन्यप्राणी याचं ज्ञान होतं. लव्हलॉक शिक्षण सुरु असताना एका फोटोग्राफरच्या दुकानात काम केले होते. १९४८ साली ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन ॲंड ट्रॉपिकल रिसर्च’ मधून त्यांनी पहिली ‘डॉक्टरेट’ मिळवली. तेव्हापासून गेली ७२ वर्षे जेम्स लव्हलॉक याचं संशोधन अविरत सुरूच आहे.

कार्य[संपादन]

दुसऱ्या महायुद्धात स्फोटक द्रव्यांमुळे होणाऱ्या भाजण्याच्या जखमा लवकर बऱ्या करण्यावर त्यांनी संशोधन केले. १९७१ साली ईसीडीचा वापर करून लव्हलॉक यांनी दाखवून दिले की १९३० मधल्या शोधानंतर तयार केलेली जवळपास सर्व सीएफसी संयुगे अजूनही जागतिक वातावरणात तशीच होती व वाढत होती. या निरीक्षणाचा वापर करून १९७४ मध्ये मोलिना व रॉलंड या वैज्ञानिकांनी सीएफसी वायू व पृथ्वीवरील ओझोन थराला पडणारे भगदाड यांचा संबंध दाखवून दिला. या शोधामुळे सीएफसी निर्मितीवर पाश्चिमात्य जगात बंदी घालण्यात आली. त्यांनी केलेली ‘गाईया गृहितकं’ याची मांडणी प्रसिद्ध झाली.[२]

पुरस्कार व बहुमान[संपादन]

१९७४ साली जेम्स लव्हलॉक यांना ‘रॉयल सोसायटीचे’ प्रमुख करण्यात आले. १९७५ मध्ये त्यांना त्स्वेट पदक मिळाले. १९८० मध्ये त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा वर्णलेखासाठी पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये जागतिक हवामान संघटनेचा ‘नॉबर्ट-जर्बिए-मम’ त्यांना मिळाला. १९९० मध्ये हनिकेन पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना जिओलॉजीकल सोसायटी ऑफ लंडनचा वोलास्टन पुरस्कार मिळाला.[३]

मृत्यू[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "James Lovelock's detailed biography in English". ecolo.org. 2020-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "World News - 'Gaia' scientist James Lovelock: I was 'alarmist' about climate change". web.archive.org. 2020-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ web.archive.org https://web.archive.org/web/20171020091013/http://www.jameslovelock.org/page7.html. 2020-03-24 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)