Jump to content

जेम्स अर्ल जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स अर्ल जोन्स (१७ जानेवारी, १९३७:आर्काबुटला, अलाबामा, अमेरिका - ९ सप्टेंबर, २०२४:पॉलिंग, न्यू यॉर्क, अमेरिका) हे अमेरिकन अभिनेते होते. सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळाची कारकीर्द असलेल्या जोन्स यांना अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट आणि बहुरंगी अभिनेता समजले जाते. यांनी नाटक, दूरचित्रवाणी तसेच चित्रपटांतून अभिनय केलेला आहे.[][] जोन्स यांना तीन टोनी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदाना साठी स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड तसेच अकॅडेमी पुरस्कार दिले गेले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Marx, Rebecca Flint. "James Earl Jones Biography". All Movie Guide. April 12, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Sperling, Nicole; Susan King (November 12, 2011). "Oprah shines, Ratner controversy fades at honorary Oscars gala". LA Times.com. November 14, 2011 रोजी पाहिले.