Jump to content

जेमी लिन स्पियर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेमी लिन स्पियर्स
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
जन्म-नावJamie Lynn Marie Spears संपादन
दिलेले नावJamie, Lynn, Marie संपादन
आडनावSpears संपादन
जन्म तारीख४ एप्रिल 1991 संपादन
जन्मस्थानMcComb संपादन
वडीलJames Parnell Spears संपादन
आईLynne Spears संपादन
भावंडेब्रिटनी स्पीयर्स, Bryan Spears संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रmusic composing संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाParklane Academy संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2002 संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
वाद्यvoice संपादन
गट-प्रकारcountry pop, लोकसंगीत संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.jamielynnspears.com संपादन

जेमी लिन स्पियर्स (४ एप्रिल, १९९१ - ) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका असून ती ब्रिटनी स्पियर्सची धाकटी बहीण आहे. स्पियर्सने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ऑल दॅट या कार्यक्रमातून बालकलाकार म्हणून केली. निकेलोडियन वरील झोई १०१ या किशोरवयीन मालिकेमध्ये (२००५-२००८) झोई ब्रुक्सची भूमिका साकारल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली;[] नंतर तिने झोई १०२ (२०२३) या चित्रपटात पुन्हा हीच भूमिका साकारली. ती नेटफ्लिक्स वरील स्वीट मॅग्नोलियास या रोमँटिक मालिकेमध्ये (२०२०-सध्या सुरू) नोरीन फिट्झगिबॉन्सची भूमिका साकारत आहे. तिला ग्रॅसी पुरस्कार, दोन निकेलोडियन किड्स चॉइस पुरस्कार आणि दोन यंग आर्टिस्ट अवॉर्ड्स यांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.

डिसेंबर २००७ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आपण गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर स्पियर्स प्रसारमाध्यमांच्या मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली होती. जून २००८ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर स्पियर्सने पाच वर्षे अभिनयातून विश्रांती घेतली होती.[]

२०१३ नंतर तिने संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. तिने द जर्नी (२०१४) या तिच्या पहिल्या कंट्री म्युझिक संगीतसंचातील हाऊ कुड आय वाँट मोर हे पहिले गाणे प्रकाशित केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Hiramine, Brie (2016-06-28). ""Zoey 101" Reunion: Jamie Lynn Spears Has Not Discussed It Yet". J-14 (इंग्रजी भाषेत). 2023-12-16 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. Starr Bowenback (October 19, 2020). "Jamie Lynn Spears Says 'Zoey 101' Didn't End Because She Was Pregnant". Cosmopolitan. July 28, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 27, 2021 रोजी पाहिले.
  3. Deborah Evans Price (April 24, 2015). "Jamie Lynn Spears on Sharing Her 'Boy' With Jana Kramer". Rolling Stone. September 8, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 3, 2015 रोजी पाहिले.