जेंडर ट्रबल (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी[१] हे प्रभावी स्त्रीवादी सिद्धांकन करणाऱ्या लेखिका जुडीथ बटलरचे[२] पुस्तक आहे. सदरचे पुस्तक १९९०, १९९९ व नंतर २००६ मध्ये रुत्लेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले आहे.

महत्वाचे मुद्दे[संपादन]

'स्त्रीवादी राजकारणाला खरेच स्त्री या कोटीक्रमाची व त्या संबंधित विषयांची गरज आहे का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न हे पुस्तक विचारते. या पुस्तकातील चार प्रकरणांच्या माध्यमातून लेखिका दाखवून देतात कि लिंगभाव हे निर्मित आहे व ते सादर केले जाते. या पुस्तकात 'ड्रॅग'[३] (एक असा व्यक्ती सामान्यतः पुरुष जो स्त्रियांचे वेश धारण करतो व बायकी व्यवहाराची अतिशयोक्ती सादर करतो) या पात्रा बाबतची चर्चा लिंगभाव या संकल्पनेला मोडकळीस आणण्यासाठी नव्हे तर लिंगभाव या कोटीक्रमाच्या वास्तवतेला अधिक गुंतागुंतीचे कारणासाठी केलेली आहे.

योगदान[संपादन]

स्त्रीवादी व क्वियर अभ्यासात हे पुस्तक महत्वाचे मानले गेलेले आहे.[४][५]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Butler, Judith (2011-09-22). Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity (en मजकूर). Routledge. आय.एस.बी.एन. 9781136783234. 
  2. ^ "www.theory.org.uk Resources: Judith Butler". www.theory.org.uk. 2018-03-24 रोजी पाहिले. 
  3. ^ "Urban Dictionary: drag queen". Urban Dictionary (en-US मजकूर). 2018-03-24 रोजी पाहिले. 
  4. ^ "A Queer Overview of Judith Butler’s [Gender Trouble]". Angel Daniel Matos, Ph.D. (en-US मजकूर). 2013-09-18. 2018-03-24 रोजी पाहिले. 
  5. ^ Harding, Sandra (1991). Whose Science? Whose Knowledge?: Thinking from Women's Lives (en मजकूर). Cornell University Press. आय.एस.बी.एन. 0801497469.